अज्ञात नंबरवरून येणाऱ्या कॉलला रोखण्यासाठी WhatsApp ने एक शानदार सुविधेचे फीचर जारी केले आहे. WhatsApp वर अज्ञात नंबरवरून कॉल आल्यानंतर आपोआप सायलेंट होईल. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी स्वतः मंगळवारी याची घोषणा केली आहे. झुकरबर्ग यांनी आपल्या घोषणेत म्हटले की, WhatsApp एक नवीन फीचर घेऊन येत आहे. ज्यात अज्ञात नंबरवरून येणारी कॉल ऑटोमेटिक सायलेंट होईल.
काय आहे WhatsApp चे नवीन फीचर
या फीचरकडे WhatsApp चे नवीन प्रायव्हसी फीचर म्हणून पाहिले जात आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या माहितीनुसार, या फीचरच्या मदतीने अज्ञात नंबरवरून येणाऱ्या कॉलपासून सुटका मिळेल. नवीन फीचरच्या मदतीने अज्ञात नंबरवरून येणारी कॉल्स ऑटोमेटिक सायलेंट केली जाऊ शकते. परंतु, यूजर्सला याचे नोटिफिकेशन येईल. यूजर्सला जर हे कॉल लिस्टमध्ये पाहायचे असतील तर ते पाहू शकतात. भारतात व्हॉट्सअॅप स्पॅम कॉलवरून खूप तक्रारी करण्यात आल्या आहेत. या फीचरमुळे मदत मिळू शकते.

वाचाः Google बंद करतेय हे पॉप्यूलर फीचर, आजच सेव्ह करा डेटा, १९ जुलै अखेरची तारीख
असे काम करेल नवीन फीचर
WhatsApp च्या नवीन प्रायव्हसी फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमचे WhatsApp ओपन करावे लागेल.
आता या ठिकाणी आय बटनवर टॅप करून सेटिंग्स मध्ये जावे लागेल. प्रायव्हसी ऑप्शनवर टॅप करावे लागेल.
या ठिकाणी खाली तिसऱ्या नंबरवर एक नवीन फीचर कॉल्स दिसेल.
आता कॉल्स ऑप्शनवर टॅप करा आणि ‘Silence unknown callers’ ऑप्शन ला ऑन करा.
यानंतर हे फीचर अॅक्टिव होईल. अज्ञात नंबरवरून कॉल आल्यास तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल.
या कॉलला तुम्ही कधीही कॉल टॅब मध्ये पाहू शकता.
वाचाः आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी उरले फक्त १० दिवस, पाहा डिटेल्स
वाचाः Asus A5 ऑल-इन-वन डेस्कटॉप भारतात लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या