वनप्लस लवकरच पुढील जनरेशन सीरीजचा स्मार्टफोन आणणार आहे. वनप्लस १२ या फोनला यावर्षीच्या अखेर पर्यंत लाँच करणार आहे. वनप्लसचा पुढील फ्लॅगशीप संबंधी अजून जास्त माहिती समोर आली नाही. परंतु, स्मार्टफोनचा डिस्प्ले आणि वनप्लस Ace 2 Pro संबंधी माहिती समोर आली आहे. फोनच्या स्पेसिफिकेशन्ससंबंधी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट Weibo वर ही माहिती समोर आली आहे. यावर्षीच्या सुरुवातीला चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनीने वनप्लस ११ ला ग्लोबल मार्केट मध्ये लाँच करण्यात आले होते.
एका टिप्स्टरच्या माहितीनुसार, वनप्लस 12 मध्ये 2K OLED डिस्प्ले मिळणार आहे. फोनमध्ये कर्व्ड एज डिस्प्ले आणि सेंटर टॉप मध्ये होल पंच कटआउट दिले जाणार आहे. यासोबत या फोनमध्ये डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि QHD+ रिजोल्यूशन सोबत येतो. रिपोर्टमध्ये हेही म्हटले की, हे अॅड करण्यात आलेल्या वनप्लस १२ मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जनरेशन 3 SoC देणार आहे. तर OnePlus Ace 2 Pro मध्ये BOE’s 1.5K OLED डिस्प्ले सोबत 1240 x 2772 पिक्सल रिजोल्यूशनसोबत कर्व्ड एजेज दिले जाऊ शकते.

वाचाः फक्त १४९९ रुपयात खरेदी करा स्मार्ट टीव्ही, फ्लिपकार्ट देत आहे शानदार ऑफर
OnePlus 12 ची स्पेसिफिकेशन आधीच लीक झाली होती. आधी आलेल्या रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, वनप्लस १२ मध्ये ६.७ इंचाचा ओलेड डिस्प्ले सोबत क्वॉड एचडी रिझॉल्यूशन आणि १२० एचझेड रिफ्रेश रेट मिळणार आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जनरेशन 3 SoC दिला जाऊ शकतो.
वाचाः 100 मेगापिक्सल कॅमेरा, 256 जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत
वाचाः iphone 15 series मध्ये दिसणार हे ३ मोठे बदल, पाहा डिटेल्स