धक्कादायक! सांगलीतील स्टोन क्रशर चालकाला ‘इतक्या’ कोटींच्या खंडणीची मागणी

हायलाइट्स:

  • स्टोन क्रशर चालकाला ३ कोटी ४ लाखांची खंडणी मागितल्याची घटना
  • स्टोन क्रशर चालकाने दिली पोलीस स्थानकात तक्रार
  • संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल

सांगली : सांगलीतील एका स्टोन क्रशर चालकाला ३ कोटी ४ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कुबेर स्टोन क्रशरचे मालक रोहितकुमार धीराजकांत गुप्ता (वय २९, रा. खणभाग, सांगली) यांनी सांगली शहर पोलिसात सोमवारी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खंडणी मागणारा कर्नाटकातील संशयित इम्तियाज रशीद कोप्पळ ( रा. हुबळी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी गुप्ता यांचा स्टोन क्रशरचा व्यवसाय आहे. सांगलीमध्ये कुबेर स्टोन क्रशर या नावाने ते व्यवसाय करतात. जानेवारी २०२० मध्ये संशयित कोप्पळ व गुप्ता यांच्यामध्ये हवेरी जिल्ह्यातील तिम्मानकट्टी बेहरी पाडा या कामाच्या साईटवर स्टोन क्रशिंग मशिन बसवून देण्याबाबत व्यवहार झाला होता. गुप्ता यांच्या कुबेर स्टोन क्रशर व संशयित कोप्पळ यांच्या एनआय इन्फ्रा सोल्युशन यांच्यामध्ये सांगलीतील कार्यालयात करार झाला होता.

रत्नागिरी जिल्ह्यातही डेल्टा प्लसचे १५ रुग्ण आढळले; आरोग्य विभागाची माहिती

करारानुसार गुप्ता यांनी ९० लाख रुपये किमतीचे क्रशर मशिन्सचे पार्टस खरेदी करून संशयित कोप्पळ यांच्या ताब्यात दिले. कराराप्रमाणे २० जानेवारी २०२१ पर्यंत प्रत्यक्ष साईटवर जाऊन स्टोन क्रशर बसवून ते कार्यान्वित करून दिले. त्यानंतर सदर ठिकाणी काम सुरू असताना मशीन बंद पडली. कराराप्रमाणे कोप्पळ याने अद्याप १६ लाख ५८ हजार रुपये देणे बाकी होते. त्याबाबत गुप्ता यांनी त्यांच्याकडे विचार केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मशीन परत मागितली असता ते देण्यास नकार दिला. तसेच क्रशर मशीन व साहित्य परत न करण्याची धमकी देऊन कराराचे उल्लंघन केले.

संशयिताने १५ मे ते २२ मे २०२१ दरम्यान फिर्यादी गुप्ता यांच्या व्हॉट्सअॅपवर मेसेज करत ३ कोटी ४ लाख ८४ हजारांची खंडणी मागितली. पैसे दिले तरच क्रशर मशीन व साहित्य परत देईन, अन्यथा कर्नाटकात आला तर जिवे मारण्याची धमकी दिली. घडलेल्या या प्रकारानंतर गुप्ता यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Source link

sangali crimesangali newsसांगलीसांगली न्यूजसांगली पोलीस
Comments (0)
Add Comment