इन्स्टाग्राम रील्स
इन्स्टाग्राम रीलच्या मदतीने तुम्ही सहज कमाई करू शकता. तुमची एखादी रील व्हायरल झाली तर, ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते. म्हणूनच तुम्हाला आधी रीलबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. अनेक इन्फ्लूएन्सर्स याच्या मदतीने कमाई करत आहेत. तुम्हीही याच्या मदतीने चांगली कमाई करू शकता. तुम्हाला फक्त कंटेटकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
बिझीनेट अकाउंट
तुमच्याकडे बिझीनेस अकाउंट असले तरीही तुम्ही मोठी कमाई करू शकता. पण या खात्यावर तुम्ही सतत काम केले तरच तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्हाला स्वतंत्र जाहिराती देखील मिळू शकतात आणि जाहिरातीच्या मदतीने तुम्ही मोठी कमाई करु शकणार आहात. पण नंतर तीच गोष्ट येते की यातून कमाई करण्यासाठी तुमचा कंटेट चांगला असणं गरजेचं आहे.
व्हायरल पोस्ट
तुम्ही सोशल मीडियावरून कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी व्हायरल पोस्ट ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे. कारण ज्या युजर्सच्या पोस्ट खूप व्हायरल होतात तेच थेट लोकांकडून कमाई करत आहेत. त्यामुळे तुमच्या पोस्ट व्हायरल झाल्या तरच तुम्ही चांगली कमाई कराल. कंटेट हटके आणि भारी असल्यास पोस्ट नक्कीच व्हायरल होऊ शकते. मग फोटो, व्हिडीओ काही व्हायरल झाले तरी तुम्हाला फायदा होतो.