Airtel च्या ३५ दिवसाच्या प्लानचे फायदे
एअरटेलने आपला या प्लानला खास प्लान म्हणून लाँच केले आहे. या प्लानची खास वैशिष्ट्ये म्हणजे याची किंमत कमी असून वैधता जास्त आहे. या प्लानची किंमत २८९ रुपये आहे. एअरटेलच्या या २८९ रुपयाच्या प्लान मध्ये ३५ दिवसाची वैधता मिळते. सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. परंतु, यात एकूण डेटा ४ जीबी मिळतो. या प्लानमध्ये ३०० एसएमएस सुद्धा मिळते. याशिवाय, प्लान सोबत Apollo 24|7 Circle, फ्री हॅल्लो ट्यून आणि Wynk म्यूझिकचे सब्सक्रिप्शन मिळते.
वाचाः 100 मेगापिक्सल कॅमेरा, 256 जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत
एअरटेलचा १९९ रुपयाचा प्लान
जर तुम्ही मोठ्या वैधतेच्या प्लानच्या शोधात असाल तर एअरटेलकडे १९९ रुपयाचा आणखी एक प्लान आहे. या प्लानमध्ये ३० दिवसाची वैधता मिळते. याशिवाय, एअरटेलच्या या प्लानमध्ये एकूण ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सोबत ३०० एसएमएस मिळते.
वाचाः अमेझॉन सेलः ५० टक्के सूट सोबत खरेदी करा लॅपटॉप, ऑफर फक्त उद्यापर्यंत
दोन्ही फ्लानमधील फरक
या दोन्ही प्लानमध्ये वैधते वरून पाच दिवसाचा फरक आहे. परंतु, याशिवाय, आणखी एक फरक आहे. २८९ रुपयाच्या प्लान सोबत अनलिमिटेड ५जी डेटा मिळेल. तर १९९ रुपयाच्या प्लान सोबत हे मिळणार नाही. एअरटेलचा २३९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीच्या प्लान वर ५जी इंटरनेट देत आहे.
वाचाः Vivo Y22 ला खरेदी करा बंपर सेलसोबत, फ्लिपकार्ट नव्हे तर या साइटवरून करा ऑर्डर