WWDC 2023 मध्ये Apple iOS 17 बाजारात उतरवले जाणार आहे. जर तुम्हाला खूप आधीपासून आयफोन १२ च्या डिस्काउंट ऑफरची उत्सूकता असेल तर ही वेळ तुमच्यासाठी परफेक्ट आहे. याशिवाय, फ्लिपकार्टवर अनेक बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्स सुद्धा मिळत आहे. परंतु, फोनला ऑर्डर करण्याआधी सर्व डील्स संबंधी सविस्तर जाणून घ्या.
वाचाः अमेझॉन सेलः ५० टक्के सूट सोबत खरेदी करा लॅपटॉप, ऑफर फक्त उद्यापर्यंत
फ्लिपकार्टवरून ऑर्डर केल्यास तुम्हाला आतापर्यंत सर्वात कमी किंमतीत फोन खरेदी करण्याची संधी आहे. आयफोन १२ ची किंमत ५९ हजार ९०० रुपये आहे. तुम्ही या फोनला ५३ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्हाला ९ टक्के डिस्काउंट मिळत आहे. एक्सचेंज ऑफरच्या मदतीने तुम्हाला वेगळा डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो.
वाचाः 100 मेगापिक्सल कॅमेरा, 256 जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत
जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला एक्सचेंज केल्यास तुम्हाला ३५ हजार रुपयाचा डिस्काउंट मिळू शकतो. परंतु, इतका डिस्काउंट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या फोनची कंडीशन चांगली असायल हवी. तसेच हा डिस्काउंट जुन्या फोनच्या मॉडलवर सुद्धा डिपेंड करतो. HDFC Bank Credit आणि Debit Card User दोन हजार रुपयाचा डिस्काउंट मिळवू शकतात. हा डिस्काउंट मिळवण्यासाठी त्यांना पेमेंट याच कार्डवरून करावा लागणार आहे.
वाचाः Airtel ने लाँच केला ३५ दिवसाच्या वैधतेचा प्लान, किंमतही कमी, पाहा फायदे