हे फीचर ऑटोमेटिक पद्धतीने फोनमध्ये अॅक्टिव होते. कंपनीने या फीचरला आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बंद करण्यासाठी सॉफ्टेवेयर अपडेट दिले आहे. तर यूजर्स सुद्धा याला मॅन्युअली डिसेबल करू शकता. एका ट्विटर यूजरने सांगितले की, रियलमी फोनवर एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्विसेजचा वापर करून यूजर डेटाला कलेक्ट केले जात होते. रियलमी अनरीड मेसेज, मिस्ड कॉल, कॅलेंडर ईव्हेंट सह अनेक डेटा कलेक्ट करीत होती.
वाचाः 100 मेगापिक्सल कॅमेरा, 256 जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत
कसे कराल चेक
सर्वात आधी तुम्हाला फोनच्या सेटिंग ऑप्शनमध्ये जावे लागेल. यानंतर अतिरिक्त सेटिंग ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. नंतर सिस्टम सर्विसवर क्लिक करावे लागे. यानंतर एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्विसेज डिसेबल किंवा इनेबल करावे लागेल.
वाचाः Airtel ने लाँच केला ३५ दिवसाच्या वैधतेचा प्लान, किंमतही कमी, पाहा फायदे
रियलमीने डेटा चोरीवर काय म्हटले
कंपनीच्या म्हणण्यानुसार, यूजरची प्रायव्हसी पूर्णपणे ठेवली जाते. सोबत यावर कंपनी लागोपाठ काम करीत आहे. आता यूजर्स एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्विसेजला मॅन्युअल डिसेबल किंवा इनेबल करू शकतात. भारतातील सर्व कायदा आणि रेग्युलेशनचे पालन कंपनी करीत आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.
वाचाः जिओची भन्नाट ऑफर! अवघ्या ५९९ रुपयात १४ ओटीटी अॅप्स, अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग