हेडफोन्समध्येही खूप ऑप्शन्स
तर खूपच म्युझिकची आवड असणाऱ्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी हेडफोन्स एक बेस्ट प्रोडक्ट आहे. सध्या मार्केटमधील आघाडीचे काही हेडफोन्स म्हणाल तर Apple AirPods Max ज्यांची किंमत ५९,९०० रुपये आहे.हे हेडफोन 40mm डायनॅमिक ड्रायव्हरसह येतात. तसंच सोनीचे Sony WH-1000XM5 वायरलेस हेडफोन २६, ९९० रुपयांना उपलब्ध असून याचाही साऊंड जबरदस्त आहे. तसंच Sennheiser HD 458 ANC फोल्डेबल ब्लूटूथ वायरलेस हेडफोन ही ८,९४६ रुपयांना उपलब्ध आहे. तसंच बोटचे स्वस्तात मस्त Boat Rockerz 450 Pro ब्लूटूथ वायरलेस हेडफोन्स १,९९९ रुपयांना आहेत.
वाचा : जर प्राणी माणसांसारखे दिसले असते तर? AI नं तयार केलेले हे ‘विचित्र’ फोटो पाहिले का?
इअरबड्स आजकाल फॉर्ममध्ये
मार्केटमध्ये आजकाल इअरबड्सना फारच मागणी आहे. यात अॅपलने अगदी सुरुवातीपासून ही कन्सेप्ट आणली असून त्यांचे एअरपॉड्स खूप विकले जातात. सध्या आघाडीवर अॅपलचे एअरपॉड्स प्रो २६,९०० रुपयांना मिळत आहेत. तर Sennheiser चे Sennheiser CX True Wireless earbuds ८ हजारांना उपलब्ध असून आणखी एक पर्याय म्हणजे Oppo Enco buds जे १,५९९ रुपयांना आहेत. याशिवाय बोट, बोल्ट कंपनीचेही स्वस्तात मस्त इअरबड्स आहेत.
वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच
ब्लूटूथ स्पीकर्सही आहेत बेस्ट ऑप्शन्स
तर ब्लूटूथ स्पीकर्समध्ये Marshall Woburn III हा एक चांगला ऑप्शन असून याची किंमत ५९,९०९ रुपये आहे. याचा कमी-फ्रिक्वेंसी बास आणि मिडरेंजमध्ये अधिक स्पष्ट साउंड याची वैशिष्ट्य आहेत. तसंच Bose चा Bose SoundLink Flex Bluetooth Portable Speaker हा १५,९०० रुपयांना उपलब्ध असून हा स्पीकर IP67 रेटिंगसह येतो ज्यामुळे ते वॉटर आणि डस्टप्रूफ आहेत.
वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल
Amazon Echo Dot
Amazon Echo Dot (5th Gen) हे प्रोडक्ट याआधीच्या Amazon च्या Echo Dot प्रोडक्ट्सच्या तुलनेत अधिक भारी आहे. याचा बास डबल आहे. हा स्मार्ट स्पीकर इनबिल्ट अल्ट्रासाऊंड मोशन डिटेक्शन आणि तापमान सेन्सरने सुसज्ज आहे जे ग्राहकांना सुसंगत इलेक्ट्रॉनिक्ससह उपयुक्त स्मार्ट होम रूटीन सेट करण्यास मदत करते. या स्पीकरच्या मदतीने आपण बरीच घरातील कामं Echo Dot ला देऊ शकतो. याची किंमत म्हणाल तर ५,४९९ रुपये इतकी आहे.
वाचा : ChatGPT म्हणजे नेमकं काय? खरंच यामुळे नोकऱ्या धोक्यात आहेत का? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
इअरफोन्सची एक चांगला ऑप्शन
तर सर्व वरील प्रोडक्ट्सच्या तुलनेत जुनं प्रोडक्ट म्हणजे इअरफोन्स. आता इअरफोन्स वापरणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी आजही हौशी लोक इअरफोन्सच वापरणं पसंद करतात. यामध्ये Sennheiser IE 200 हे इअरफोन १४, ९९० रुपयांना मिळत आहे. तसंच Sony Premium MDR-XB55AP हे इअरफोन्सही २,०९९ मिळत आहे. याशिवाय Xiaomi Dual Driver Dynamic Bass हे इअरफोन्स ७७५ रुपयांना आहे.
वाचा : WhatsApp चे खास फीचर्स आहेत एकदम खास, अनेकांना माहितही नाहीत…