‘ही चर्चा महाराष्ट्रासाठी लांछनास्पद’; भाजपचा अनिल देशमुखांवर निशाणा

हायलाइट्स:

  • अनिल देशमुखांविरुद्ध लूक आऊट?
  • भाजपनं साधला निशाणा
  • भाजप आमदाराची ट्वीट करत टीका

मुंबईः मनी लॉन्डरिंग प्रकरणात अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी) आता अनिल देशमुखांविरुद्ध (Anil Deshmukh)’लूक आऊट’ नोटिस बजाविण्याच्या विचारात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यावरुन भाजपनं (BJP) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी एक ट्वीट करत अनिल देशमुखांवर जोरदार निशाणा साधला आहे. ट्वीटमध्ये ते म्हणतात. ‘महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना ईडीचे समन्स चुकावल्यास अटक होणार का? ही चर्चा महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचाः मोठी बातमी! लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही लवकरच लोकल मुभा?

‘सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळल्यानंतर माजी गृहमंत्र्यांनी सरकारी यंत्रणांना सहकार्य करणे नितिमत्तेला धरुन होईल. थोडी तरी लाज बाळगा,’ अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान, गृहमंत्री या नात्याने देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या आरोपानुसार ‘ईडी’ने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यामध्ये देशमुख यांचे स्वीय सचिव व स्वीय सहाय्यक, यांना अटक करण्यात आली आहे. तसेच देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची सुमारे साडे चार कोटी रुपयांची मालमत्तादेखील जप्त करण्यात आली. त्यामुळे ‘ईडी’ने अनिल देशमुख यांना चार वेळा समन्स बजावला होता. दरवेळेस त्यांनी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असल्याने हा समन्स चुकवला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायलायाने अनिल देशमुख यांना कुठलाही अंतरिम दिलासा देण्यास सोमवारी नकार दिला.

वाचाः पीएसआय आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण; व्हायरल ऑडिओ क्लिपमुळं खळबळ

Source link

anil deshmukhanil deshmukh and ed caseAtul Bhatkhalkarbjplookout notice to anil deshmukhअनिल देशमुख
Comments (0)
Add Comment