Nothing Phone 2 च्या लाँचिंगच्या बातम्या खूप आधीपासून येत आहेत. या फोन सोबत Nothing स्मार्टवॉच लाँच होण्याची शक्यता आहे. परंतु, यासंबंधी कंपनीने अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. परंतु, नुकत्याच एका समोर आलेल्या रिपोर्टनुसार, कंपनी एक नवीन प्रोडक्ट लाँच करू शकते. कंपनी स्मार्टवॉच आणण्याची तयारी करीत आहेत. एका प्रसिद्ध टिप्स्टरने याची डिटेल्स दिली आहे.
लाँच होऊ शकते Nothing स्मार्टवॉच
टिप्स्टर मुकुल शर्माने या वॉचला स्पॉट केले आहे. नथिंग ट्रेडमार्क आणि सर्टिफिकेशन लिस्टिंग ला पाहिले गेले आहे. या ठिकाणी एक संकेत दिले आहे की, नथिंग कंपनी स्मार्टवॉच लाँच करू शकते. कंपनीने “CMF BY NOTHING” ट्रेडमार्कची नोंद केली आहे. टिप्स्टरने हेही संकेत दिले आहे की, मॉडल नंबर D395 चे एक प्रोडक्ट BIS सर्टिफिकेशनवर पाहिले गेले होते. ही एक स्मार्टवॉच आहे. BIS लिस्टिंगनुसार, नथिंग चाहत्यांसाठी लवकरच स्मार्टवॉच लाँच केली जाऊ शकते.

वाचाः Airtel ने लाँच केला ३५ दिवसाच्या वैधतेचा प्लान, किंमतही कमी, पाहा फायदे
Nothing Phone (2) मध्ये काय असेल खास
या फोनवरून अनेक माहिती समोर येत आहे. आली आहे. या फोनची लाँचिंग डेट सुद्धा समोर आली आहे. या फोनला ११ जुलै रोजी भारतात लाँच केले जाणार आहे. यासोबत स्मार्टवॉच लाँच केली जाऊ शकते. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेट दिला जाऊ शकतो. तर ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनमध्ये अमोलेड डिस्प्ले आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट दिला जाईल. फोनची डिझाइन ट्रान्सपॅरेंट असेल.
वाचाः Amazon Sale: सर्वात स्वस्तात खरेदी करा 5G स्मार्टफोन, थेट १० हजाराची सूट
वाचाः जिओची भन्नाट ऑफर! अवघ्या ५९९ रुपयात १४ ओटीटी अॅप्स, अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग