नथिंग फोन (2) ची किंमत
एका रिपोर्टनुसार, नथिंग फोन (2) युरोपीयन बाजारात दोन पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. हँडसेटमध्ये 8GB रॅम आणि 256GB इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय असेल. त्याची किंमत ७२९ युरो (सुमारे ६५,६०० रुपये) असेल. तर 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंट ८४९ युरो (सुमारे ७६,४०० रुपये) या किंमतीला लाँच केला जाईल. तर नथिंग फोन (1) स्मार्टफोन हा 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. त्याची किंमत ४६९ युरो (४२,४०० रुपये) आहे. मागील मॉडेलप्रमाणेच हा फोनपांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल.
नथिंग फोन (2) चे काही फीचर्स
नथिंग फोन (2) ला ६.७ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळणार आहे, असे अहवालातून समोर आले आहे. स्क्रीन फुलएचडी+ रिझोल्यूशनसह येईल. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120 Hz असू शकतो. हा डिवाइस Android 13 आधारित Nothing OS 2.0 सह लाँच होईल. हँडसेटला इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर मिळण्याची शक्यता आहे. तसंच फोनला तीन वर्षांची सुरक्षा आणि तीन वर्षांची Android OS अपडेट्स मिळतील अशीही माहिती आहे. यामध्ये Qualcomm Snapdragon 8 Plus Gen 1 चिपसेट असून 4700mAh बॅटरी मिळू शकते. अद्याप कॅमेरा संबधित माहिती समोर आलेली नाही.
वाचा : itel कंपनीने फक्त १,४९९ रुपयांना लाँच केला खास फोन, UPI पेमेंट करण्याचाही आहे ऑप्शन