Victus 16 (2023)
एचपीचा हा लॅपटॉप गेमिंग नोटबुक मध्ये सर्वात स्वस्त लॅपटॉप आहे. या लॅपटॉप मध्ये १६.१ इंचाचा डिस्प्ले सोबत फुल एचडी रिझॉल्यूशन आणि 165Hz रिफ्रेश रेट दिले आहे. डिस्प्ले १०० टक्के sRGB कलर सोबत येते. यूजर्सला लॅपटॉप मध्ये 13th-Gen Intel Core i7 प्रोसेसर सोबत GeForce RTX 4060 मोबाइल GPU पर्यंत कॉन्फिगर करू शकतात. कंपनीने यात रोबस्ट कूलिंग दिली आहे. यात ओमेन टेम्पेस्ट कूलिंग सोल्यूशन आणि IR थर्मापाइल सेंसर दिले आहे. यात 83Wh च्या बॅटरी सोबत 16GB ची DDR5 रॅम, 512GB एसएसडी, HD वेबकेम आणि ड्यूल स्पीकर्स दिले आहेत.
HP Omen 16 (2023)
हा लॅपटॉप फीचर्स मध्ये Victus (2023) सारखाच आहे. परंतु, याची डिझाइन वेगळी आहे. काही जागी अडवॉन्स्ड लेवल गेमर्सला ध्यान ठेवून अपग्रेड करण्यात आले आहे. लॅपटॉप मध्ये १६.१ इंचाचा डिस्प्ले सोबत QHD पर्यंत रिझॉल्यूशन आणि 240Hz चा रिफ्रेश रेट मिळतो. व्हिज्युअल्ससाठी HDR आणि 16:10 अस्पेक्ट रेश्योसोबत येते. यात फुल एचडी कॅमेरा दिला आहे. Omen (2023) मध्ये 13th-Gen Intel Core i7 पर्यंत CPU आणि RTX 4050 GPU मिळतो. यात 32GB पर्यंतची DDR5 रॅम, 1TB स्टोरेज मिळते. HP Omen 16 (2023) ची सुरुवातीची किंमत १ लाख ४ हजार ९९९ रुपये आहे.
वाचाः Airtel ने लाँच केला ३५ दिवसाच्या वैधतेचा प्लान, किंमतही कमी, पाहा फायदे
HP Omen Transcend 16 (2023)
या लॅपटॉप मध्ये सर्वात जास्त अपग्रेड्स दिले आहेत. हे लाइटवेट डिझाइन सोबत येते. यूजर्स या लॅपटॉपला GeForce RTX 4070 सीरीज ग्राफ़िक्स पर्यंत कॉन्फिगर करू शकतात. सोबत यात 13th-Gen Intel Core i9-13900HX प्रोसेसर पर्यंत वापर केला जाऊ शकतो. Omen Transcend 16 एचपीचा सर्वात स्लिम आणि हलका गेमिंग लॅपटॉप आहे. याचे वजन फक्त २.१ किलोग्रॅम आहे. हे 19.9 mm चा आहे. यात 97Wh ची मोठी बॅटरी आणि ओमेन टेम्पेस्ट कूलिंग सिस्टम दिली आहे. HP Ome Transcend 16 ची किंमत १ लाख ५९ हजार ९९९ रुपये आहे.
वाचाः Nothing Phone 2 च्या लाँचिंगनंतर Nothing स्मार्टवॉच येणार, समोर आली लिस्टिंग