आईच्या ५०व्या वाढदिवशी दिलं सरप्राइज गिफ्ट; उल्हासनगरच्या या तरुणाचं तुम्हीही कराल कौतुक

हायलाइट्स:

  • उल्हासनगरच्या तरुणाचं आईला अनोख बर्थडे गिफ्ट
  • मुलानं दिलेले गिफ्ट पाहून आईला अश्रू अनावर
  • आईची इच्छा पूर्ण केल्याचं समाधान

उल्हासनगरः आईच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगरच्या तरुणानं सरप्राईज गिफ्ट दिलं आहे. या तरुणानं दिलेल्या या गिफ्टची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. तर, सोशल मीडियावर या तरुणावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

उल्हासनगरच्या प्रदीप गरड यांने आईच्या वाढदिवसानिमित्त तिला सरप्राईज म्हणून हेलिकॉप्टर राईड गिफ्ट केली आहे. लेकानं दिलेले गिफ्ट पाहून प्रदीपच्या आईला गहिवरुन आलं होतं. तर, आपल्या गिफ्टमुळं आईची इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद प्रदीपच्या चेहऱ्यावर झळकत होता.

मुलं लहान असताना पतीचं निधन झाले. त्यानंतर काबाड कष्ट करत रेखा गरड यांनी तिन्ही मुलांना वाढवलं. मुलांच्या पालनपोषणासाठी त्यांनी लोकांच्या घरची कामेही केली. मुलांना चांगलं शिक्षण घेता याव म्हणून त्यांनी अतिशय कष्ट घेतले. मोठा मुलगा प्रदीप याला शिक्षणासाठी आश्रम शाळेत घातले. तिथेच प्रदीपनं आपलं शिक्षण पूर्ण केले व जिद्दीने चांगली नोकरी मिळवली.

प्रदीप बारावीला असताना अचानक त्यांच्या घरावरुन हेलिकॉप्टर गेलं. त्यावेळी आपल्याला कधी यात बसायला मिळेल?, असं रेखा सहज बोलून गेल्या. आपल्या आईची ही इच्छा प्रदीपच्या मनात पक्की बसली. आपल्या आईची ही इच्छा प्रदीपनं अखेर आईच्या ५०व्या वाढदिवशी पूर्ण केली.

वाचाः ‘ही चर्चा महाराष्ट्रासाठी लांछनास्पद’; भाजपचा अनिल देशमुखांवर निशाणा

आईच्या वाढदिवशी आपल्याला सिद्धिविनायकला दर्शनासाठी जायचंय असं सांगून आईला थेट जुहू एअरबेसला आणलं. तिथे हेलिकॉप्टर पाहून आईला अश्रू अनावर झाले. आईसह प्रदीप, त्याचा लहान भाऊ, पत्नी व दोन मुलांनीही हेलिकॉप्टरचा आनंद घेतला.

वाचाः नवोदित चित्रकारांसाठी मुंबई मेट्रोची खास मोहिम; वाचा सविस्तर

आईने आम्हाला खूप हालअपेष्टा सहन करुन लहानाचं मोठं केलं. आम्हाला स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यामुळं तिची इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळणे हेच आमच्यासाठी भाग्य असल्याचं प्रदीपनं सांगितलं आहे.

वाचाः मोठी बातमी! लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही लवकरच लोकल मुभा?

Source link

surprise helicopter ride for motherulhasnagar youthआईला अनोखे बर्थ-डे गिफ्टउल्हासनगरहेलिकॉप्टर राईड
Comments (0)
Add Comment