- सर्व प्रथम UIDAI च्या वेबसाइटवर जा.
- मग होमपेजवर माझे आधार ऑप्शनवर क्लिक करा
- त्यानंतर दिसणाऱ्या मेन्यूमध्ये आधार सेवा या ऑप्शनला निवडा
- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमल आयडी वेरिफिकेशनवर क्लिक करा.
- मग एक नवीन टॅब ओपन होईल. मह मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून वेरिफायवर क्लिक करा.
- कॅप्चा कोड टाकून ओटीपी पाठवा आणि त्यावर क्लिक करा.
या सर्वानंतर एक मेसेज येईल ज्यात जर मोबाईल नंबर आधीच लिंक असेल तर थेट एक मेसेज येईल की हा नंबर आधीच लिंक आहे. तसंच जर तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तर तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्रात जावं लागेल.
आधार अपडेटची तारीख वाढवली
आधार कार्डमध्ये कोणतेही बदल करण्यासाठी मोफत सुविधा ही १४ जूनपर्यंत असणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. पण युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात UIDAI ने आता ही १४ जूनची तारीख थेट १४ सप्टेंबर २०२३ केली आहे. त्यामुळे मोफत आधार अपडेट करण्याची तारीख आका ३ महिन्यांनी वाढवली गेली आहे. त्यामुळे आता १४ सप्टेंबर २०२३ पर्यंत तुमचा आयडेंटिटी फ्रूफ किंवा अॅड्रेस प्रुफ सादर करुन ऑनलाईन पद्धतीने मोफत आधार अपडेट करु शकता.
वाचा : Jio आणत आहे सर्वात स्वस्त 5G फोन, कधी होणार लाँच? काय असेल किंमत?