Diploma Admission : डिप्लोमा प्रवेश अर्जांना मुदतवाढ, विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत अर्ज भरता येणार

दहावीनंतर तंत्रज्ञान विश्वातील शिक्षणासाठी डिप्लोमा हा एक उत्तम पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे डिप्लोमा प्रवेशाला विद्यार्थ्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्रात यंदा इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी एकूण ३७५ संस्थामध्ये मिळून साधारणपणे १ लाख जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी, १ जूनपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची आणि पडताळणीची सुरुवात झाली होती. २१ जून ही अर्ज सादर करण्याची आणि तपासणीची अंतिम तारीख होती. परंतु, विविध अडचणींमुळे, दिलेल्या वेळेत विद्यार्थ्यांकडून अर्ज सादर न झाल्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

विविध आरक्षणांअंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना आणि पडताळणीच्या वेळी जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रवेश अर्जासोबत सादर करणे अनिवार्य असते.. परंतु, अशी कागदपत्र मिळवण्यासाठी विलंब होत आहे. शिवाय, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीही विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तंत्रशिक्षण संचालनालयाने अर्ज सादर आणि तपासणी करण्याच्या प्रक्रियेला या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच, ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकानुसार,

  • विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेश अर्ज भारता आणि पडताळणी करू घेता येतील.
  • तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने ३ जूनला प्रवेशासंदर्भात तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) प्रसिद्ध केली जाईल.
  • ४ आणि ५ जुलैला अर्जामधील त्रुटी आणि सुधारणा नोंदवता येईल.
  • ७ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) प्रसिद्ध केली जाईल.

डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेचा अर्ज dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरता येईल. या प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या होणार असून, तंत्रशिक्षण संचालनालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर या मुदतवाढी बाबत माहिती दिली आहे.

(वाचा : FYJC Admission: अकरावीला बक्कळ जागा, ऑफलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरूवात )

Source link

Careerdate extendeddiploma admissiondirector technical educationdteengineeringpolytechnicpolytechnic admissionPolytechnic Admission 2023post ssc diploma
Comments (0)
Add Comment