Vivo Y36 ची किंमत
या फोनला एकाच व्हेरियंट मध्ये खरेदी करू शकता. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनला १६ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या फोनला फ्लिपकार्ट, विवो इंडिया ई स्टोर सह सर्व रिटेल पार्टनर स्टोर्सवर उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनला व्हाइब्रेंट गोल्ड आणि मेट्योर ब्लॅक कलर मध्ये खरेदी करू शकतात.
वाचाः अर्ध्या किंमतीत खरेदी करा Room Heater, मिळतेय बंपर सूट
Vivo Y36 चे फीचर्स
हा फोन अँड्रॉयड १३ वर काम करतो. हा फनटच ओएस १३ वर आधारित आहे. या फोनमध्ये ६.६४ इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यात फ्लॅट फ्रेमच्या आत 2.5D कर्व्ड डिझाइन उपलब्ध करण्यात आली आहे. ही स्लीम बॉडी आहे. कंपनीच्या माहितीनुसार, याला प्रीमियम लूक सोबत आणले आहे. यात डायनामिक ड्युअल रिंग दिले आहे. हे कॅमेराजवळ दिले आहे. यात फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.
वाचाः HP ने आणला सर्वात स्वस्त लॅपटॉप, फीचर्सला नाव ठेवायला जागाच नाही
Vivo Y36 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनचा सेन्सर ५० मेगापिक्सलचा पोट्रेट सेन्सर दिला आहे. दुसरा २ मेगापिक्सलचा बोकेह सेन्सर दिला आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसर सोबत येतो. या फोनमध्ये ८ जीबी रॅम दिली आहे. तर १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ४४ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिली आहे. हा फोन ४ जी कनेक्टिविटी सोबत येतो.
वाचाः Nothing Phone 2 च्या लाँचिंगनंतर Nothing स्मार्टवॉच येणार, समोर आली लिस्टिंग