Online Money Transaction : इंटरनेट नसताना पाठवायचे आहेत अर्जंट पैसे? ‘या’ सोप्या टिप्स येतील काोमाला

नवी दिल्ली : Send Money without internet : ऑनलाइन पैसे पाठवणे आजकाल खूपच सोपे झाले आहे. म्हणजे अगदी सहज आजकाल एका क्लिकवर पैशाचे मोठमोठे व्यवहार होत असतात. म्हणजे बँक अॅप असो किंवा युपीआय एका झटक्यात आजकाल ऑनलाइन पैसे पाठवता येतात. पण ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी इंटरनेट हा एक उत्तम सोर्स आहे. पण कधीकधी इंटरनेट कनेक्शन उपलब्ध नसते आणि तुम्हाला ऑनलाइन पैसे पाठवावे लागतात. अशा वेळी काय कराल? तर अशा परिस्थितीत तुम्ही इंटरनेटशिवाय देखील काही सोप्याप्रकारे ऑनलाइन पैसे पाठवू शकता. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. तर हेच तुम्ही कसं कराल ते जाणून घेऊ…जर तुम्हाला इंटरनेट कनेक्शनशिवाय ऑनलाइन पैसे पाठवायचे असतील तर तुम्ही एक करु शकता ते म्हणजे सबस्क्राइबर डायल कोड (USSD) सेवा. तर प्रत्येक बँकेद्वारे प्रदान केलेल्या USSD सेवांचा तुम्ही वापर करून, फोनच्या डायलरमध्ये विशेष कोड डायल करून पैसे पाठवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेने पुरवलेली USSD सेवा कशी काम करते ते जाणून घ्यावं लागेल. यासाठी तुम्ही बँकेत चौकशी करुु शकता, सहसा, या सेवा *99# ने सुरू होतात.

बँकेच्या शाखेत जाऊन थेट व्यवहार करा
याशिवाय आणखी एक सोपी पद्धत म्हणजे तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत किंवा काउंटरवर जाऊन त्यांना रोख रक्कम देऊ शकता ज्यानंतर तुम्हाला हवे असलेल्या अकाउंटवर बँक थेट पैसे पाठवू शकतील. यासाठी तुम्हाला तुमचा बँक पासबुक, आधार कार्डसह पॅन कार्ड असे आवश्यक कागदपत्र लागू शकतात.

टीप – हे सर्व पर्याय इंटरनेट कनेक्शनशिवाय पैसे पाठवण्याचे मार्ग आहेत, परंतु ते वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन योग्य चौकशी करायला लागणार असून बँक देईल त्या सूचनाचतचे पालन करावे लागेल.

वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल

Source link

how to send money without internetonline paise kase pathvaycheonline payment stuckupi transaction issueऑनलाईन पैसे कसे पाठवालपैसे ऑनलाईन पाठवा
Comments (0)
Add Comment