फोन थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात ठेवू नका
फोन वापरात असताना कसाही गरम होतो. पण एरवी देखील फोन योग्य ठिकाणी ठेवावा. स्मार्टफोन थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये. कारण सूर्याच्या थेट संपर्कामुळे स्मार्टफोनचे तापमान जास्त वाढेल. अशा स्थितीत फोन काम करणे थांबवू शकतो. काही प्रकरणांमध्ये, फोन कायमचा खराब होऊ शकतो. जेव्हा तुम्ही फोन चार्जिंगमध्ये ठेवता तेव्हा चुकूनही उन्हात ठेवू नका.
स्मार्टफोनचं कव्हर योग्य निवडा
स्मार्टफोनसाठी कव्हर वापरणे बर्याच बाबतीत चांगले आहे. म्हणजे कव्हर पडल्यामुळे स्मार्टफोनचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. पण फोन गरम होत असल्यास, फोन गरम होत असताना कव्हर काढून टाकणे चांगले. त्यामुळे कव्हर निवडतानाही थोडी काळजी घ्या.
अतिगेमिंग टाळा
उन्हाळ्यात फोनवर हेवी गेम खेळणे नेहमीच टाळावे. त्याचप्रमाणे जर तुम्ही बजेट स्मार्टफोनवर गेमिंग करत असाल तर ते अधिक धोकादायक ठरू शकते. कारण बजेट स्मार्टफोन हेवी गेमिंगसाठी बनवले जात नाहीत. यामध्ये कूलिंग पॅडचा वापर केला जात नाही.
वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स