सैन्यदलाद्वारे तांत्रिक आणि विधी विभागासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

सशस्त्र दलाच्या तांत्रिक आणि विधी (टेक्निकल आणि लॉ) विभागांअंतर्गत ही प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सैन्य दलाच्यावतीने शोर्ट सर्व्हिस सर्व्हिस कमिशन अंतर्गत तांत्रिक (एसएससी-टेक ) आणि ‘जज अॅडव्होकेट जनरल (जॅग) अशा महत्त्वाच्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.वरील दोन्ही प्रवेशासाठी कोणतीही लेखी परीक्षा नसून थेट सर्विस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखतींद्वारे उमेदवारांची निवड पुढील प्रशिक्षणासाठी केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (ओटीए) येथे प्रवेश मिळणार आहे.

एसएससी-टेक प्रवेशांतर्गत अभियांत्रिकीची पदवी (Engineering Degree) असलेल्या तसेच शहीद अधिकारी व शहीद जवानांच्या पत्नीला अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी एकूण १९६ जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, त्यातील १७५ जागा पुरुष आणि १९ जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहे. तसेच, दोन जागा या शहीद अधिकारी आणि जवानांच्या पत्नीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

एसएससी-टेक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा २० ते २७ वर्षांपर्यंतची असून शहीद पत्नींसाठी ती ३५ वर्षांपर्यंत करण्यात आली आहे.

‘जॅग’ प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांकडे विधीची पदवी (लॉ डिग्री) असणे गरजेचे आहे. तसेच या पदासाठी २१ ते २७ वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. या प्रक्रियेद्वारे ५ पुरुष आणि २ महिला अशी एकूण ७ उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

एसएससी टेकसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जुलै तर जॅग प्रवेशाकरिता २१ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

महत्त्वाचे :

  • ‘जॅग’ प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांकडे विधीची पदवी असणे आवश्‍यक
  • वयोमर्यादा २१ ते २७ वर्षे
  • या प्रक्रियेद्वारे पाच पुरुष आणि दोन महिला अशी एकूण सात उमेदवारांची निवड केली जाणार
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • एसएससी टेकसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जुलै तर जॅग प्रवेशाकरिता २१ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार

Source link

army jobsarmy office jobsdefenceindiaIndian Armyjobs at indian armylaw departmentnew jobsrecruitmenttechnical department
Comments (0)
Add Comment