UPI पेमेंटसाठी अधिक अॅप्स वापरु नका
आजकाल मार्केटमध्ये बरेच युपीआय पेमेंट ऑप्शन्स आहेत. पण या साऱ्यांचा वापर करणं टाळलं पाहिजे. त्यामुळे फोनमध्ये युपीआय पेमेंटसाठी एकापेक्षा अधिक अॅप्सचा वापर करणं टाळणं चांगलं. कारण जितके अधिक अॅप्स तितक्या अधिक जागी आपल्याला आपली खाजगी माहिती टाकावी लागते. त्यामुळे एकापेक्षा जास्त युपीआय अॅप्स डाऊनलोड करु नये आणि ते करताना देखील अॅप स्टोअर, प्ले स्टोअर अशा वेरिफायड ठिकांणांवरुनच करावे.
वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स
PIN चुकूनही शेअर करु नका
युपीआय पेमेंटमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिन. तुम्हाला पेमेंट करताना एक विशिष्ट पासवर्ड विचारला जातो तेच अंक तुमचा युपीआय पिन असतात. जो योग्य टाकल्यावर पेमेंट सक्सेसफुल होते. दरम्यान हा पिन फारच महत्त्वाचा आणि खाजगी असल्यामुळे तो चुकूनही कोणासोबतही शेअर करु नका. तसंच कोणाला त्याबद्दल कळाल्यास त्वरीत बदला.
वाचा : Aadhar Update : मोफत ऑनलाइन आधार अपडेटची तारीख वाढवली, १४ जून नाही ‘या’ तारखेपर्यंत आहे संधी
UPI App कायम अपडेटेड ठेवा
प्रत्येक UPI App ला कंपनी कायम अपडेट देत असते. नवनवीन फीचर्स आणण्यासाठी तसंच सेफ्टी फीचर्स आणखी स्ट्राँग करण्यासाठी कंपनी कायम अपडेट्स देत असते. त्यामुळे तुम्हाला तुमचं अॅप नीट चालू ठेवायचं असल्यास नेहमीच लेटेस्ट व्हर्जनचे अपडेट मारत राहावे.
वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल
App लॉकवरही लक्ष ठेवा
आजकाल प्रत्येक स्मार्टफोनमध्ये फोन सोबतच अॅप्सना देखील लॉक करण्याची सुविधा दिली जाते. त्यामुळे तुम्ही आवर्जून युपीआय अॅप्सना लॉक केलं पाहिजे. कारण कधीही लहान मुलं किंवा चूकीच्या हातात तुमचा फोन गेल्यास तुमच्या अकाउंटमधून पैसे थेट गायब होऊ शकतात, किंवा अकाउंट हॅकही होऊ शकतं.
वाचा : AC Care : एसीची कुलिंग घरबसल्या वाढवा, फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो
अनोळखी लिंक ओपन करु नका
अनेकदा WhatsApp किंवा दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही हॅकर्स लिंक पाठवत असतात. ज्या लिंकवर क्लिक केल्यावर तुमचे अकाउंट थेट हॅक होऊ शकते. अनेकदा काहीजण बँक कर्मचारी असल्याचं सांगून धोका देतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करु नये. तसंच अधिकृत कॉन्टॅक्टमधून आलेल्या लिंक्सवर क्लिक करु नका.
वाचा: UPI ने पेमेंट करताना सारखं फेल होतंय? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो