पदसंख्या आणि आरक्षणासंदर्भातील माहिती http://mahabhumi.gov.in वर उपलब्ध आहे. तलाठी पदभरतीसाठी यंदा खेळाडू, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी अशा विविध निकषांच्या आधारे आरक्षण देण्यात आले आहे.
( वाचा : Jobs Opening at RBI : भारतीय रिझर्व बँकेत नोकरी संधी जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता आणि निकष )
परीक्षेचे स्वरूप :
- तलाठी पदभरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल.
- मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी/ अंकगणित या विषयांसाठी प्रत्येकी ५० गुण, अशी एकूण २०० गुणांची परीक्षा उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने द्यावी लागणार आहे.
- प्रत्येक विषयाच्या विभागात २५ प्रश्न असून, प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी २ गुण असतील.
- सदर परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान असेल. परंतु, मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) समान राहील.
- निवडप्रक्रियेत पात्र होण्यासाठी उमेदवाराला किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य असेल.
पात्रता :
- अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय असावा
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे
- मागासवर्गीय उमेदवार १८ वर्षांपेक्षा कमी आणि ४३ वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा.
- पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी कामाल वयोमर्यादा ५५ वर्षे राहील.स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य आणि सन १९९१ चे जनगणना कर्मचारी व १९९४ नंतरचे निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी ४५ वर्षे असेल.
- दिव्यांग उमेदवारांसाठी (४० टक्के दिव्यांगत्व असल्यास आणि प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य) वयोमर्यादा सरसकट ४५ वर्ष ठेवण्यात आली आहे.
- प्रकल्प आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे आहे .
- माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सूट हि सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलातील सेवेईटका कालावधी अधिक ३ वर्ष इतकी राहील.
- तसेच, दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यत राहील.
( वाचा : FE 2023 Admission : प्रथम वर्षीय इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. )
आवश्यक कागदपत्रे :
- उमेदवाराने प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना उमेदवाराने संबंधित कागदपत्र आणि दाखले पीडीएफ (PDF) स्वरुपात अपलोड करणे अत्यावश्यक आहे.
- उमेदवाराने अर्जातील नावाचा पुरावा म्हणून (एसएससी किंवा तस्यम) गुणपत्रिका सादर करणे गरजेचे आहे.
- वयाचा आणि शैक्षणिक पात्रतेचा पुरावा.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा.
- अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलेअर (NCL) प्रमाणपत्र.
- पात्र दिव्यांग व्यक्ती/माजी सैनिक/खेलाडू/अनाथ/प्रकल्प अथवा भूकंपग्रस्त/ अंशकालीन पदवीधर/ नावात बादल झाला असल्याचा पुरावा.
- वरील प्रमाणपत्र शासनाच्या विहित संकेतस्थळावर सादर केल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
सर्वसाधारण पण महत्त्वाचे :
- सदर अर्ज फक्त ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वीकारला जाणार आहे.
- उमेदवार फक्त एकाच जिल्ह्यासाठी अर्ज सादर करता येईल. वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी किंवा एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास असे अर्ज अपात्र ठरवण्यात येतील.
- शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरच उमेदवार अर्ज सादर करू शकतील.
- अर्ज सादर केल्यानंतर दिलेल्या वेळेत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख लक्षात घेऊन उमेदवाराने दिलेय वेळेत अर्ज आणि शुल्क भाराने बंधनकारक राहील.
जिल्हा केंद्र निवडताना :
- प्रस्तुत परीक्षेसाठी विविध केंद्रांचा तपशील http://mahabhumi.gov.in वर परीक्षा योजना/पद्धती या सदरामध्ये उपलब्ध आहे.
- अर्ज सादर करताना जिल्हा (परीक्षा) केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
- जिल्हा परीक्षा केंद्र बदलाची विनंती कोणत्याही परिस्थितीत किंवा कारणास्तव मान्य केली जाणार नाही.
परीक्षा शुल्क :
- तलाठी-पेसा क्षेत्राबाहेरील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये तर, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अशा राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
- तलाठी-पेसा क्षेत्रातील राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
- माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.
- अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणाऱ्या ‘सबमिट’ बटनावर क्लिक केल्यानंतर ‘पे फी (Pay Fee) वर क्लिक करून अर्ज पूर्ण करायचा आहे.
- परीक्षा शुल्क हे संपूर्णतः Non-Refundable आहे.
महत्त्वाच्या तारखा :
- उमेदवारांने अर्ज सादर करावयाचा कालावधी : २६ जून २०२३ पासून १७ जुलै २०२३, रात्री ११.५५ वाजेपर्यंत
- ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख : १७ जुलै २०२३, रात्री ११.५५
- परीक्षेचा दिनांक आणि कालावधी : http://mahabhumi.gov.in वर उपलब्ध होईल. तसेच, उमेदवारांना पत्राद्वारे कळविण्यात येईल.
सदर परीक्षेमधून भरावयाच्या तलाठी संवर्गातील सर्व जागांचा सविस्तर तपशील शासनाच्या http://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.