जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. याचा अर्थ तुम्ही या प्लान अंतर्गत कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग करु शकणार आहात. तसच या प्लानमध्ये यूजरला दररोज १.५ जीबी डेटा मिळेल. अशा प्रकारे, या प्लानमध्ये एकूण 126 GB डेटा मिळेल. डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64 Kbps पर्यंत कमी होतो. याच्या मदतीने तुम्ही इंटरनेट सर्फिंग, व्हिडिओ पाहणे, ऑनलाइन गेमिंग आणि इतर डेटा अशा विविध फायद्यांचा आनंद घेऊ शकता. याशिवाय या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. यासोबतच JioCinema, JioTV+, JioSaavn, JioMeet सारख्या जिओच्या अनेक अॅप्सना मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे.
Jio आणणार आहे Jio 5G फोन
एकापेक्षा एक भारी ५जी रिचार्ज मार्केटमध्ये आणणारी रिलायन्स जिओ कंपनी आता थेट Jio 5G Phone लाँच करणार अशी माहिती समोर आली आहे. कंपनी मागील काही दिवस या ५जी फोनवर काम करत असून विशेष म्हणजे हा फोन सर्वात स्वस्त 5G फोन असणार आहे. या फोनचे काही लीक फोटोही समोर येत आहेत. अशातच एक ट्वीटर युजर @AroitNahiMila याने जिओच्या या ५जी फोनचा फोटो शेअर केला आहे. त्याच्या मते रिलायन्स कंपनी दिवाळीच्या आसपास हा फोन लाँच करु शकते.
वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल