​Smartphone Tips : पावसाळ्यात स्मार्टफोनचा स्पीकर बिघडला? घरच्या घरी करु शकता रिपेअर, फॉलो करा सोप्या टिप्स

आधी नेमका बिघाड काय ते समजून घ्या

सर्वात आधी म्हणजे नेमकी समस्या काय आहे ते शोधा. स्पीकर का बंद होऊ शकतो याची अनेक कारणे असू शकतात, जसे की धूळ, घाण, पाणी किंवा इतर काही. तर सर्वात आधी स्पीकर कशामुळे खराब झाला असेल ते पाहा, तसंच स्पीकरचं काम बंद झालं तर नक्की बिघाड त्यातच आहे की, दुसरा काही इश्यू आहे, ते पाहून मग रिपेअरींग करु शकता…

वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल

आधी फोन बंद करा

काहीही रिपेअर करण्याआधी फोन पूर्णपणे बंद करा. स्पीकर दुरुस्त करण्यापूर्वी, तुमचा स्मार्टफोन बंद करुन शक्य असल्यास बॅटरी काढून टाका. असं करुन रिपेअरींग केल्यास तुमच्या फोनला कोणताही धोका नसेल, अन्यथा सुरु फोन दुरुस्त करताना आणखी बिघडू शकतो.

​वाचा : ChatGPT म्हणजे नेमकं काय? खरंच यामुळे नोकऱ्या धोक्यात आहेत का? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

फोन योग्यरित्या साफ करा

तर फोनला खासकरुन फोनच्या स्पीकरला अस्वच्छ करणाऱ्या वस्तूंपासून फोन योग्यरित्या साफ करा. म्हणजेच धूळ, घाण किंवा अशाप्रकारच्या वस्तूंमुळे अनेकदा स्पीकर बंद होतो. या सर्वांना साफ करा. मऊ कापड किंवा ब्रश वापरून स्पीकर नीटप्रकारे स्वच्छ करा.

​वाचा : BSNL चा एक वर्षाचा रिचार्ज अगदी स्वस्तात, महिन्याला खर्च करा फक्त १२६ रुपये, दररोज मिळेल 2GB डेटा​​

स्पीकर नीट तपासा

तुमचा स्पीकर खराब झाला नाही याची आधी खात्री करा. काहीवेळा, स्पीकर योग्यरित्या काम करत असेल तरी आवाज येत नाही कारण साऊंड सेटिंग बंद केलेली असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ध्वनी सेटिंग्ज तपासा आणि स्पीकर सुरू देखील करु शकता.

​वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स

कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता

जर तुम्ही सोपे हे सर्व प्रयत्न करूनही स्पीकर काम करत नसेल, तर तुम्ही जवळच्या सेवा केंद्राशी अर्थात कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता. ते तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतील आणि तुमचा स्पीकर ठीक करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करतील. त्यामुळे वरील काही सोप्या सूचनांचे पालन करून, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा स्पीकर दुरुस्त करण्यात यशस्वी होऊ शकता. नाहीतर तुम्हाला रिपेअरिंग करणाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल.

​वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल

Source link

How to Repair Smartphone at HomeSmartphone Repairing TipsSmartphone Speaker Issueस्मार्टफोन रिपेअर घरच्या घरी कसा करालस्मार्टफोनचा स्पीकर इश्यू कसा रिपेअर कराल
Comments (0)
Add Comment