हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत मुंबईत १९८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण २ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई: मुंबई (Corona in Mumbai) महापालिका क्षेत्रात आज कालच्या तुलनेत करोनाच्या (Coronavirus) नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली असली तरी, सलग दोन दिवस ही संख्या २०० च्या खाली आली आहे. आज मुत्यूंची संख्या देखील तुलनेने घटली आहे. गेल्या २४ तासात १९८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या १९० इतकी होती. तर, दिवसभरात ३०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. काल ही संख्या २७१ इतकी होती. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ३ इतकी होती. ( mumbai registered 198 new cases in a day with 304 patients recovered and 2 deaths today)
याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख १८ हजार ६५८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ९९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के इतका खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता १ हजार ९८६ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.
क्लिक करा आणि वाचा- राज्यात करोनाची स्थिती ‘जैसे थे’!; सक्रिय रुग्णसंख्येत मात्र किंचित घट
मुंबईत आज २८ हजार ५०८ चाचण्या
मुंबईत आज एकूण २८ हजार ५०८ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये एकही सक्रिय कंटेनमेंट झोन नसून एकूण २१ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा- पवारसाहेब, तुम्ही कधीतरी खरे बोलणार आहात का?; सदाभाऊ खोतांचा निशाणा
आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती
२४ तासांत बाधित रुग्ण – १९८
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ३०४
बरे झालेले एकूण रुग्ण – ७१८६५८
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%
एकूण सक्रिय रुग्ण- २६४०
रुग्ण दुपटीचा कालावधी- १९८६ दिवस
कोविड वाढीचा दर (१० ऑगस्ट ते १६ ऑगस्ट)- ०.०४ %
क्लिक करा आणि वाचा- ७५ लाखांचे दागिने लुटणारी टोळी गजाआड; नागपूर पोलिसांची कारवाई