mla yamini jadhav: शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात; आयकर विभागाची ‘ही’ मागणी

मुंबई: शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव या अडचणीत आल्या आहेत. याचे कारण म्हणजे आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. यामिनी यशवंत जाधव यांनी सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमचे उमेदवार वारीस पठाण यांची पराभव केला होता. (mla status of shiv sena mla yamini jadhav in danger)

सन २०१९ च्या विधानसभा निवडणूक लढवत असताना यामिनी यशवंत जाधव यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबाबत चुकीची माहिती दिली असे आयकर विभागाचे म्हणणे आहे. जाधव यांच्या प्रतिज्ञापत्राची तपासणी केली असता ही बाब उघड झाली आहे. या मुळे यामिनी जाधव यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी आयकर विभागाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुंबईकरांना दिलासा! सलग दुसऱ्या दिवशी २०० च्या खाली नवी करोना रुग्णसंख्या

आयकर विभागाने केलेल्या तपासात कोलकाता येथील शेल कंपन्यांद्वारे झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये यामिनी जाधव, त्यांचे पती यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पैसे कमावल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामिनी जाधव यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून १ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, असे जाधव यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात लिहिले होते. मात्र तपासात प्रधान डीलर्स ही एक शेल कंपनी आहे असे स्पष्ट झाले. ही कंपनी कोलकात्यात असेलेला एंट्री ऑपरेटर उदय महावर हे चालवत होते. उदय महावर यांचे नाव नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातही होते. चौकशीत १५ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे.

क्लिक करा आणि वाचा- राज्यात करोनाची स्थिती ‘जैसे थे’!; सक्रिय रुग्णसंख्येत मात्र किंचित घट

यामिनी जाधव १ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगत असल्या तरी हा पैसा त्यांचा स्वत:चाच होता असे आयकर विभागाचे म्हणणे आहे. महावर यांनी सन २०११-१२ मध्ये प्रधान डीलर्स कंपनीची स्थापना केल्याचे महावर यांनी चौकशीत सांगितले आहे. यात पैसा कमावल्यानंतर कंपनी जाधव कुटुंबाला विकण्यात आली.

२०१९ च्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याडकडे ७.५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले आहे. यात २.७४ कोटींची जंगम मालमत्ता होती. तर आपले पती यशवंत जाधव यांच्याकडे ४.५९ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे नमूद केले होते. यात १.७२ कोटी रुपयांच्या जंगम मालमत्तेचा समावेश आहे.

क्लिक करा आणि वाचा- पवारसाहेब, तुम्ही कधीतरी खरे बोलणार आहात का?; सदाभाऊ खोतांचा निशाणा

Source link

Income Tax DepartmentYamini Jadhavआमदार यामिनी जाधवआय़कर विभागयामिनी जाधव
Comments (0)
Add Comment