(वाचा : Maharashtra Talathi Bharti 2023: महसूल व वन विभाग तलाठी पदभरती; ४३४४ पदांसाठी महाभरती)
इंटरनेटची माहिती असणाऱ्या व्यक्तींना या माध्यमातून ब्लॉगिंग, ई-कन्सल्टिंग, फ्रिलान्स सर्व्हिस प्रोव्हायडर, यूट्युब, आर्टिकल रायटिंग, ऑनलाइन ट्यूटर, ऑनलाइन सर्व्हे आदी काम कार्यक्षेत्रांतून स्वतःचा ई-बिझनेस सुरू करता येईल.
काही वर्षांपूर्वीपर्यंत ब्लॉगिंग वेळ संकल्पनेबाबत लोक अनभिज्ञ होते, पण आज हा ऑनलाइन इन्कम मिळवून च्या देणारा हमखास पर्याय म्हणून समोर हाती आला आहे. प्रभावी भाषा कौशल्य असणाऱ्या व्यक्ती नवीन कथा, कविता त्या लिहू इच्छितात किंवा स्वतःचे अनुभव शब्दबद्ध करू पाहतात, मत किंवा निरीक्षण नोंदवू इच्छितात त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
ब्लॉगिंगच्या माध्यमातून ऑनलाइन बिझनेस करताना एक फायदा म्हणजे ब्लॉग साइट तयार करणे. हे विनामूल्य असून ब्लॉग अपडेट करणे खूपच सोपे काम आहे. त्यामुळेच अनेक व्यक्ती आपल्या ब्लॉगची स्पेस पे पर क्लिक प्रोग्रॅम/गुगल अॅडसेन्स अशा जाहिरातदारांना विकून किंवा उत्पादनविक्री (सेलिंग प्रॉडक्ट्स) यावर परीक्षण लिहून, ब्लॉगमध्ये या जाहिरातदारांच्या लिंक टाकून (ॲफिलिएट मार्केटिंग) इत्यादी माध्यमातून पैसे कमावतात.
भाषेवर प्रभुत्व असेल, तर कंटेट रायटिंग हा पर्याय तुमच्यासाठी खुला आहे. विविध वेबसाइट्ससाठी तुम्ही लेखन करून पैसे कमवू शकता. आपले अस्तित्व क दाखवून देणे (व्हिजिबिलिटी) हा वेबसाइट असण्यामागचा उद्देश आहे आणि म्हणूनच वेबसाइट असणारी प्रत्येक व्यक्ती न्यूज अपडेट किंवा नवीन सेवा देऊन आपली वेबसाइट लाइव्ह आणि हॅपनिंग ठेवणे पसंत करते. अशाप्रकारे आपली वेबसाइट परिणामकारक बनवताना अनेक कंपन्यांना कंटेट रायटरची गरज भासत असते. इथेच त्यांच्यासाठी रोजगाराची संधी निर्माण होते.
(वाचा : FE 2023 Admission : प्रथम वर्षीय इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात.)
Ghost Writer बनण्याचा आणखी एक पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे. स्वतःची कथा/लेख लिहिणे इथे अपेक्षित नसले तरी मुख्य कंण्टेट रायटरला त्याच्या कामात मदत करण्याचे काम हे घोस्ट रायटर करतात. अशा कामात मुख्य कंण्टेट रायटरचे नाव प्रकाशित होते. मात्र ज्याने ती कथा लिहिण्यासाठी कष्ट घेतले आहेत त्याच्या वाट्याला कोणत्याही प्रकारचे कौतुक येत नाही. मुख्य कंण्टेट रायटर आणि घोस्ट रायटर यांच्यादरम्यान झालेल्या करारानुसार आर्थिक मोबदला फक्त या घोस्ट रायटरला मिळतो.
ई-कन्सल्टिंग हा आणखी एक पर्याय ऑनलाइन करिअरसाठी उपलब्ध आहे. विविध संस्था, संघटना, व्यावसायिक इत्यादींना आपले या क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन/ज्ञान आणि कौशल्य पुरवण्याचे काम ई-कन्सल्टंट करतात. काही वर्षं पूर्णवेळ काम करून अनुभव गोळा केल्यावरच हे तज्ज्ञ अशा प्रकारचे काम करण्यास सुरुवात करतात.
अनेक जण आपले कौशल्य/नैपुण्य आणि माहिती यांच्या आधारे फ्रिलान्स सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून वेबसाइट डिझायनर्स, प्रोग्रॅमर्स, कंण्टेट डेव्हलपर्स, मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट आदी प्रकारचे काम करतात.
(वाचा : Indian Army : सैन्यदलाद्वारे तांत्रिक आणि विधी विभागासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात)