तब्बल ४० वर्षांनंतर झेवियर्स कॉलेजमध्ये मराठीचे पुनरागमन; पहिल्याच वर्षी तब्बल १२० विद्यार्थ्यांची पसंती

मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये तब्बल चाळीस वर्षानंतर पुन्हा मराठी भाषेचे वर्ग भरणार आहेत. नवीन राष्ट्रीय धोरणामुळे (एनईपी) पदवीच्या पहिल्या वर्षासाठी हे वर्ग सुरु होण्याचा मार्ग खुला झाला आहे. पहिल्याच वर्षी या निर्णयाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, तब्बल १२० विद्यार्थ्यांनी यासाठी प्रवेश घेतला आहे. केवळ कला शाखेतीलच नव्हे, तर विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थीही मराठी भाषा शिकणार आहेत.

विद्यार्थ्यांकडून मिळणार प्रतिसाद आणि कॉलेजमधील मराठीचे एकमेव शिक्षक निवृत्त झाल्यामुळे सेंट झेवियर्स कॉलेजमधील बीए मराठी हा अभ्यासक्रम १९८५ मध्ये बंद करण्यात आला होता.त्यामुळे १९८५ साली मराठी विभाग बंद केल्यानंतर पुढच्या काळात बीए (मराठी) हा पदवी अभ्यासक्रमही बंद करण्यात आला होता.

(वाचा : Before Confirming Your Admission: कोणत्याही विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्यापूर्वी हे नक्की तपासा)

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय शिक्षण धोरणातील एईसी अंतर्गत मराठी भाषेचा पर्याय दिला जाईल. विद्यार्थ्यांना आता मुख्य, आणि ऐच्छिक विषयांसोबत मराठी विषय निवडण्याचा पर्याय असेल. पहिली फेरीतील प्रवेश १९ जूनपासून सुरू झाले असून, आतापर्यंत १२० विद्यार्थ्यांनी मराठी विषय निवडला आहे. सेंट झेव्हियर्स कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र शिंदे यांनी सांगितले की, मोरेश्वर पेठे हे मराठी विभागात कार्यरत होते. मराठी विभागात सेवा देणारे ते एकमेव प्राध्यापक होते. १९८४ मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर हा विभाग बंद करण्यात आला.

यंदापासून राज्यातील स्वायत्त कॉलेजांमध्ये ‘एनईपी’ची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये क्षमता वृंद्धिंगत करणारे अभ्यासक्रम शिकवण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार संभाषण कौशल्यात भर घालणारे अभ्यासक्रम शिकविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यातून सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये यंदा विद्यार्थ्यांसाठी मेजर आणि मायनर विषय म्हणून मराठीचा अभ्यासक्रम निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

(वाचा : Maharashtra Talathi Bharti 2023: महसूल व वन विभाग तलाठी पदभरती; ४३४४ पदांसाठी महाभरती)

त्यानुसार, या वर्षापासून पदवीला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑप्शनल लँग्वेज म्हणून ‘संभाषणात्मक मराठी’ (Conversational Marathi) हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा पहिल्या फेरीअखेर कॉलेजमध्ये पदवीसाठी आतापर्यत जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यातील सुमारे १२० विद्यार्थ्यांनी हा विषय निवडला आहे. विद्यार्थ्यांना दोन क्रेडिट्ससाठी हा विषय शिकवलं जाणारा आहे.

पुढील महिन्यापासून पदवीच्या प्रथम वर्षासाठी मराठीचे वर्ग सुरु केले जाणार आहेत. तूर्तास, कॉलेजमध्ये मराठी विषय शिकवण्यासाठी पूर्णवेळ प्राध्यापक नसल्यामुळे ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक अतिरिक्त वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणार आहेत. गरज भासल्यास अतिरिक्त शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती कॉलेज प्रशासनाने दिली.

(वाचा : Chandrakant Patil Announcement : उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन केल्या महत्त्वपूर्ण घोषणा)

याआधीही झाला होता प्रयत्न…

मोरेश्वर पेठे हे मराठी विभागात कार्यरत असणारे एकमेव प्राध्यापक होते. १९८४ मध्ये ते निवृत्त झाले. शिवाय, त्यावेळी या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसादही मिळत नव्हता.

कॉलेजने नंतर मराठीसाठी पार्ट टाइम शिक्षक नेमण्याचा प्रयत्नही केला होता. पण, विद्यार्थी संख्या फारच कमी असल्यामुळे अखेर वर्षभरात मराठीचा अभ्यासक्रम बंद झाला. त्यामुळे १९८५-८६ पासून झेविअर्स कॉलेजमध्ये मराठी विषय उपलब्ध नाही.

(वाचा : FE 2023 Admission : प्रथम वर्षीय इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात.)

‘२०१६ – १७’ मध्ये एग्नेलो मेनेझेस हे प्राचार्य असताना कनिष्ठ महाविद्यालयाने मराठी अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. पण विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद पाहता त्या प्रयत्नालाही यश आलं नाही. त्यामुळे कॉलेज प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून मराठी अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करत होतो. पण प्रत्यक्षात सुरू करण्यात अपयश आल्याचे स्पष्ट होत आहे.

मात्र आता राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये मराठी विषय पुन्हा सुरु होऊन याला विद्यार्थ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Source link

bachelors degreedegreeeducation newsmarathimarathi after 40 yearMarathi LanguageNational Education Policyst. xaviers collegexaviers mumbaixeviers
Comments (0)
Add Comment