तुमच्या फोनवर कोणते अॅप सर्वाधिक जागा घेतात
तुम्ही तुमच्या iPhone किंवा Android स्मार्टफोनच्या Settings मध्ये जाऊन हे शोधू शकता.
तुमच्या iPhone वर कोणते अॅप्स सर्वाधिक स्टोरेज वापरत आहेत हे शोधण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
तुमच्या iPhone वर सेटिंग्ज अॅपवर जा.
जनरल पर्यायावर टॅप करा.
आता, आयफोन स्टोरेज पर्यायावर क्लिक करा आणि नंतर अॅप्स सूचीवर जा.
येथे तुम्हाला सर्वात जास्त जागा घेणारे अॅप्स दिसतील.
आता उपयोगी नसलेले अॅप्स डिलीट करा.
Android स्मार्टफोनमध्ये पुढील स्टेप्स फॉलो करा:
Google Play Store अॅपवर जा आणि प्रोफाइल चिन्हावर टॅप करा.
येथे मॅनेज अॅप्स आणि डिव्हाइसवर क्लिक करा.
येथे तुम्हाला अॅप्स दिसतील जे साईजच्या आधारावर सूचीबद्ध केलेले असतात.
याशिवाय, तुम्ही सर्वात जास्त जागा वापरणारे अॅप्स देखील तपासू शकता.
ते कामाचे नसल्यास ते हटवा. यामुळे जागा मोकळी होईल.
वरील सर्व गोष्टी केल्यावर फोन मोकळा होईल आणि आपोआपच फास्ट चालायला लागेल.
वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल