७५ लाखांचे दागिने लुटणारी टोळी गजाआड; नागपूर पोलिसांची कारवाई

हायलाइट्स:

  • ७५ लाखांचे दागिने लुटणाऱ्या लुटारूंच्या टोळीला गुन्हेशाखा पोलिसांनी केले गजाआड.
  • या टोळीने आतापर्यंत सुरत, गोंदिया, भंडारा व नागपुरात लुटपाट केल्याचे समोर आले आहे.
  • लुटारू कळमना परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना अटक केली.

नागपूर: भंडाऱ्यातील स्वाती ज्वेलर्सचे संचालक विनोद भुजाडे यांच्याकडील ७५ लाखांचे दागिने लुटणाऱ्या लुटारूंच्या टोळीला गुन्हेशाखा पोलिसांनी नागपुरातील कळमना परिसरात केली. ओम अशोक यादव (वय २६ रा.प्रतिभा लॉनजवळ ,कळमना) , रघू कृष्णा यादव (वय २३ ), वासुदेव यादव (वय २१ दोन्ही रा. मंगलम बाजारवजळ, कळमना), राकेश विजय प्रधान (वय ५० ) , श्रावण सागर यादव (वय २१) व चिरंजीव ऊर्फ शुभम संजय यादव रा.बालाघाट,अशी अटकेतील लुटारूंची नावे आहेत.

या टोळीने आतापर्यंत सुरत, गोंदिया, भंडारा व नागपुरात लुटपाट केल्याचे समोर आले आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास दागिने असलेल्या दोन बॅग घेऊन भुजाडे हे मोपेडने जात होते. राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलपंप ठाणा टी-पॉर्इंट परिसरातील दुकानासमोर भुजाडे यांनी मोपेड पार्क केली. दोन बॅग मोपेडवरच ठेऊन ते दुकानाचे कुलूप उघडण्यासाठी गेले. यादरम्यान मोटारसायकलवर आलेले दोन लुटारू दोन्ही बॅगा घेऊन पसार झाले.

क्लिक करा आणि वाचा- राज्यात करोनाची स्थिती ‘जैसे थे’!; सक्रिय रुग्णसंख्येत मात्र किंचित घट

भुजाडे यांनी जवाहरनगर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.पोलिसांनी माथनी टोलनाक्यापर्यंत लुटारूंचा शोध घेतला. मात्र पोलिसांना लुटारू आढळून आले नाही. लुटारू नागपुरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जवाहरनगर पोलिसांनी नागपूर पोलिसांना कळविले. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात गुन्हेशाखा पोलिसांनी लुटारूंचा शोध सुरू केला.

क्लिक करा आणि वाचा- पवारसाहेब, तुम्ही कधीतरी खरे बोलणार आहात का?; सदाभाऊ खोतांचा निशाणा

लुटारू कळमना परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून दागिने जप्त केले. या टोळीतील चार सदस्य भंडाऱ्यातील लुटपाटीच्या घटनेत सहभागी होते,अशी माहिती पोलिसांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा- बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर राणेंना येऊच देणार नाही; राऊत कडाडले

Source link

gang stealing jeweleryjewelery worth rs 75 lakhNagpur policeनागपूर पोलिसांची कारवाई७५ लाखांचे दागिने लुटणारी टोळी
Comments (0)
Add Comment