आजचे पंचांग आणि दिनविशेष ३० जून २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती आषाढ ९, शक संवत १९४५, आषाढ शुक्ल, द्वादशी, शुक्रवार, विक्रम संवत २०८०, सौर आषाढ मास प्रविष्टे १६, जिल्हिजा ११, हिजरी १४४५ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ३० जून २०२३, सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, वर्षा ऋतु.

राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. द्वादशी तिथी अर्धरात्रौ १ वाजून १७ मिनिटापर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ. विशाखा नक्षत्र सायं ४ वाजून १० मिनिटापर्यंत त्यानंतर अनुराधा नक्षत्र प्रारंभ. साध्य योग अर्धरात्रौ १ वाजून ३२ मिनिटापर्यंत त्यानंतर शुभ योग प्रारंभ. बव करण दुपारी २ वाजेपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र सकाळी १० वाजून २० मिनिटापर्यंत तूळ राशीत त्यानंतर वृश्चिक राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-०६,
सूर्यास्त: सायं. ७-१९,
चंद्रोदय: सायं. ४-१७,
चंद्रास्त: पहाटे २-४८,
पूर्ण भरती: सकाळी ९-२ पाण्याची उंची ३.८६ मीटर, रात्री ९-१५ पाण्याची उंची ३.४९ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे २-४६ पाण्याची उंची १.०७ मीटर, दुपारी ३-२८ पाण्याची उंची २.२८ मीटर.

दिनविशेष: तिथिवासर सकाळी ८-२० पर्यंत, वामन पूजन.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ६ मिनिटे ते ४ वाजून ४६ मिनिटापर्यंत. अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ५३ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटे ते ३ वाजून ४० मिनिटापर्यंत. निशिथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ५ मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून २२ मिनिटे ते ७ वाजून ४२ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ४ वाजून १९ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी १ जुलैला ५ वाजून २७ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते दुपारी १२ वाजेपर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. सकाळी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून १४ मिनिटे ते ९ वाजून ९ मिनिटापर्यंत. यानंतर १२ वाजून ५३ मिनिटे ते १ वाजून ४८ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : कनकधारा स्तोत्राचा पाठ करा आणि लक्ष्मी मातेला पांढऱ्या वस्तूंचा नैवेद्य दाखवा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 30 june 2023आजचे पंचांगआजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२दिनविशेषशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment