Nothing Phone (2) ला कसं बुक कराल
या फोनला फ्लिपकार्टवर पुन्हा ऑनलाइन बुक केले जाऊ शकते.
इच्छूक ग्राहक २ हजार रुपये पेमेंट करून या फोनला प्री बुक करू शकतात. ही रक्कम रिफंडेबल आहे.
ज्या ग्राहकांनी या फोनला प्री बुक केले आहे. त्यांना ११ जुलैला फोन खरेदी करण्याची संधी मिळेल.
ग्राहकांना पेमेंट पूर्ण करण्यासाठी २० जुलै रात्री ११.५९ पर्यंत वेळ दिली आहे.
जर तुमचे मन बदलले तर तुम्ही दिलेली २ हजार रुपयाची रक्कम तुम्हाला परत मिळू शकते.
वाचाः नव्या रंगात येताच Motorola Edge 40 चा धुमाकूळ, पाहा डिटेल्स
प्री-बुकिंग ऑफर
प्री-बुकिंग ऑफर मध्ये Nothing Phone (2) ला बॅक केसमध्ये ४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. याची किंमत १२९९ रुपये आहे.
९९९ रुपयाच्या किंमतीचा Nothing Phone (2) स्क्रीन प्रोटेक्टर ३९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.
८ हजार ४९९ रुपये मध्ये लाँच करण्यात आलेली Nothing Ear (Sticker) ४ हजार २५० रुपये किंमतीत उपलब्ध होईल.
Nothing (Power) ची किंमत २४९९ रुपये आहे. परंतु, याला १४९९ रुपये किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे.
वाचाः 7000mAh बॅटरी आणि ८ जीबी रॅमचा फोन येतोय, किंमत १० हजारांपेक्षा कमी
Nothing Phone (2) चे फीचर्स
या फोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. यात फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट उपलब्ध होईल. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ प्लस झेन 1 चिपसेट सोबत येईल. फोनमध्ये 4700mAh ची बॅटरी दिली जाईल. या फोनमध्ये Nothing ओएस 2.0 दिला जाईल. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. याचा पहिला सेन्सर ५० मेगापिक्सलचा असेल. तसेच फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.
वाचाः स्वस्तात खरेदी करा Tecno CAMON 20 Pro 5G, लिमिटेड वेळेसाठी ऑफर