Uddhav Thackeray: धर्म जगणे आणि धर्म जपणे यातील अंतर जाणा!; CM ठाकरेंचे परखड बोल

हायलाइट्स:

  • ‘श्री गाडगे बाबा’ जीवनचरित्राची दहावी आवृत्ती आली.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते झाले प्रकाशन.
  • गाडगेबाबांच्या विचारसरणीनुसार सरकार काम करतंय!

मुंबई: गाडगेबाबा यांच्या विचारसरणीनुसार आमचे सरकार काम करीत असून, त्यांच्या जीवनचरित्राचे विविध भाषांमध्ये भाषांतर करून त्यांचे कार्य जगभरात पोहचवले पाहिजे, त्यासाठी राज्य शासन आवश्यक ती सर्व मदत करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज म्हणाले. (CM Uddhav Thackeray On Gadge Baba Jivan Charitra )

वाचा:शरद पवारांना ‘ते’ चांगलं माहीत आहे!; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप

प्रबोधनकार ठाकरे लिखित ‘श्री गाडगे बाबा’ जीवनचरित्राच्या दहाव्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री तथा संत गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षा अॅड. यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार उल्हास पवार, इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार, मिशनचे चेअरमन मधुसूदन मोहिते-पाटील आदी उपस्थित होते. संत गाडगे बाबांनी अंधश्रद्धेवर आघात करून खरा धर्म शिकवला, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘धर्म जगणे आणि धर्म जपणे यातील अंतर आपल्याला समजले पाहिजे. धर्म जगायचा असतो हे बाबांनी कृतीतून दाखवून दिले. भुकेल्याना अन्न, तहानलेल्याना पाणी, गरीब मुलामुलींना शिक्षण आदी दशसूत्रीतून हाच खरा धर्म आहे हे त्यांनी असंख्य व्याख्यानांतून जनतेपर्यंत पोहोचवले. त्यांनी कीर्तनातून लोकशिक्षण घडवले.’

वाचा: मॉलमध्ये लहान मुलांना असा मिळणार प्रवेश!; राज्य सरकारचा सुधारित आदेश

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, माझे आजोबा प्रबोधनकार यांनी लिहिलेल्या आणि वडील बाळासाहेब ठाकरे यांनी मुखपृष्ठ चितारलेल्या या जीवनचरित्राचे प्रकाशन मुख्यमंत्री म्हणून करताना मला मनापासून आनंद होत आहे. प्रबोधनकार आणि संत गाडगेबाबा यांच्यात एक अनोखे नाते होते. गाडगेबाबांनी वक्तृत्वातून समाजातील अनिष्ठ प्रथांविरुद्ध लोकांचे प्रबोधन केले. त्यांनी केवळ कीर्तने केली नाहीत तर शाळा उभारल्या, अन्न छत्रे सुरू केली, धर्मशाळा बांधल्या. गाडगे बाबांचे विचार पुढे नेण्यासाठी मिशनने काम करत राहावे, महाराष्ट्र शासन या मिशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली.

अॅड. ठाकूर म्हणाल्या, संत गाडगेबाबा हे कृतीमधील आणि विचारामधील स्वच्छता जोपासणारे संत होते. गाडगेबाबा, प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा देशामध्ये पोहचवायचा असेल तर त्यांचे पुस्तकरूपी जीवन चरित्र प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचेल अशी व्यवस्था व्हायला हवी. धर्म, जातीभेदांमध्ये वाढ करणाऱ्या विभाजनवादी शक्तींबाबत जनजागृती करायची असेल तर हे पुस्तक उपयुक्त ठरेल. गाडगेबाबांची २०२६ मध्ये १५० वी जयंती असून त्यानिमित्ताने मिशनमार्फत विविध उपक्रम हाती घेतले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

वाचा: महाराष्ट्रात पाच कोटी लसवंत!; ही विक्रमी कामगिरी करणारं दुसरं राज्य

Source link

shri gadge baba jivan charitrashri gadge baba jivan charitra newsuddhav thackeray latest newsuddhav thackeray on gadge baba jivan charitrauddhav thackeray on gadge maharajउद्धव ठाकरेगाडगे बाबाप्रबोधनकार ठाकरेबाळासाहेब ठाकरेसंत गाडगे महाराज
Comments (0)
Add Comment