रेल्वेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; ३६२४ जागांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात

पश्चिम रेल्वेने नुकतीच काही जागांसाठी भरती होणार असल्याची.यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली असून, विविध विभागातील अपरेंटिस या पदांसाठी ही भरती असणार आहे.

अपरेंटिस [ फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, सुतार, पेंटर (सामान्य), मेकॅनिक (डीएसएल), मेकॅनिक (मोटर व्हेईकल), संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), लघुलेखक (इंग्रजी).] अशा विविध ३ हजार ६२४ जागांसाठी भरती असून, भरतीसाठीचे प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

(वाचा : Indian Army : सैन्यदलाद्वारे तांत्रिक आणि विधी विभागासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात)

पात्र उमेदवारांनी रेल्वे प्रशासनाच्या https://www.rrc-wr.com/ या लिंकच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करायचा आहे. संबंधित जागांसाठीची अर्ज प्रक्रिया २७ जून २०२३ पासून सुरु झालेली असून, २६ जुलै २०२३ पर्यंत उमेदवारांना या पदभरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

थोडक्यात पण महत्त्वाचे :

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

(वाचा : MahaTransco Recruitment 2023 : राज्याच्या वीज पारेषण विभागात नोकरीची संधी; ३१२९ पदांसाठी भरतीची घोषणा)

Source link

government jobs in maharashtrajob news in marathijobs in maharashtrajobs in railway 2023jobs in western railwayrailway jobssarkari nokriwestern railwaywestern railway apprentice recruitment 2023
Comments (0)
Add Comment