शुक्रवार, ३० जून २०२३ पर्यंत या सत्रात पहिल्या फेरीत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात ७ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
(वाचा : मुंबई विद्यापीठाच्या १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा )
एमए मानसशास्त्र, पत्रकारिता व जनसंपर्क अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला सुरुवात :
यूजीसीने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आयडॉलच्या एमए मानसशास्त्र , एमए पत्रकारिता व एमए जनसंपर्क या तीन नव्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली असून, या तिन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे.
पदवीस्तरावरील बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स अँन्ड फायनान्स, बीएस्सी आयटी,बीएस्सी कम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर स्तरावरील एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी,हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्पुटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२३ आहे.
ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असून, विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्या.
(वाचा : उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन केल्या महत्त्वपूर्ण घोषणा )
विभागीय उपकेंद्रावर मार्गदर्शन व अध्ययन साहित्य वितरण
आयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून याठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. तर पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे.
अभ्यासक्रम निहाय बुधवार, ३० जून २०२३ पर्यंत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या :
अभ्यासक्रम आणि विद्यार्थी संख्या
१. प्रथम वर्ष बीए : १ हजार ६३६ विद्यार्थी
२. प्रथम वर्ष बी. कॉम : २ हजार ३२५ विद्यार्थी
३. प्रथम वर्ष बीकॉम अकाउंट्स अँन्ड फायनान्स : २०४ विद्यार्थी
४. प्रथम वर्ष बीएस्सी आयटी व कम्प्युटर सायन्स : २१२ विद्यार्थी
५. प्रथम वर्ष एमए : १ हजार ८२ विद्यार्थी
६. प्रथम वर्ष एमकॉम : १ हजार ४६८ विद्यार्थी
७. प्रथम वर्ष एमएस्सी : १५९ विद्यार्थी
(वाचा : राज्यात नव्या नऊ मेडिकल कॉलेजांची सुरुवात; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा)