व्हॉट्सअॅप संबधित नवनवीन अपडेट्सची माहिती देणाऱ्या WABetaInfo ने माहिती दिली आहे की ज्या प्रकारे एचडी फोटो पाठवले जातात त्याचप्रमाणे व्हिडिओसाठी अपडेटेड व्हॉट्सअॅप व्हर्जन अॅपच्या ड्रॉईंग एडिटरमध्ये एचडी बटण देखील देत आहे. याचा अर्थ असा की व्हिडिओ पाठवण्यापूर्वी, वापरकर्त्यांना क्वॉलिटी हवी तशी करता येणार आहे. सध्या डीफॉल्ट सेटिंग्जनुसार, डेटा वापर आणि स्टोरेज स्पेस कमी करण्यासाठी WhatsApp व्हिडिओ कॉम्प्रेस करते. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ पाठवताना तो आपोआप कॉम्प्रेस होतो. पण आता नव्या एचडी पर्यायामुळे चांगल्या क्वॉलिटीत व्हिडीओ पाठवता येतील. नवीन फीचरसह, Android वापरकर्त्यांना त्यांचे व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जन 2.23.14.10 वर अपडेट करावे लागेल. तुम्ही जर WhatsApp बीटा प्रोग्रामचा भाग असाल तर तुम्हाला हे अपडेट मिळालेच असेल.
वाचा : एकदम स्लिम, कमी वजनाचे स्मार्टफोन कोणते? Motorola, Vivo, Apple चे ‘हे’ आहेत हलके-फुलके फोन्स
१०० फोटो ही एकाचवेळी पाठवता येणार
याव्यतिरिक्त, व्हॉट्सअॅप आता बीटा परीक्षकांना एकाच वेळी १०० फोटो शेअर करण्याची परवानगी देत आहे. हे वैशिष्ट्य अद्याप अॅपच्या मूळ आवृत्तीवर उपलब्ध नाही. सध्या फोटो सेंड करण्याची मर्यादा ३० आहे. हे फीचर अँड्रॉइड 2.23.4.3 बीटा अपडेटमध्ये दिसले आहे. हे सर्व फीचर लवकरच व्हॉट्सअॅपवर येऊ शकतात.
वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल