Google Pixel 6a ची किंमत आणि ऑफर
या फोनच्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ४३,९९९ रुपये आहे परंतु २९ टक्के सूट देऊन हा फोन ३०,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. यावर हे १३ हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट उपलब्ध आहे. या फोनला ५ पैकी ४.३ रेटिंग देण्यात आली आहे. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँक कार्डने पेमेंट केल्यावर १२५० रुपयांची सवलत दिली जाईल. स्टँडर्ड EMI प्लॅन अंतर्गत, प्रत्येक महिन्याला १०९० रुपये भरावे लागतील. नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत दरमहा ५,१६७ रुपये भरावे लागतील. जर तुमच्याकडे जुना फोन असेल तर तुम्हाला २८,७०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यानंतर, फोन अवघ्या २,२९९ रुपयांना खरेदी करता येईल. या फोनचे फीचर्स पाहू…
Google Pixel 6a चे फीचर्स
या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. तसेच गुगल टेन्सर प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात ६.१४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. फोनमध्ये डुअल रेअर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा पहिला सेन्सर १२.२ मेगापिक्सेलचा आहे. दुसरा १२ मेगापिक्सेलचा आहे. त्याच वेळी, 8-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 4410mAh इतकी आहे.
वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल