या जागांसाठी, १ जूनपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची आणि पडताळणीची सुरुवात झाली होती. २१ जून ही अर्ज सादर करण्याची आणि तपासणीची अंतिम तारीख होती. परंतु, विविध अडचणींमुळे, दिलेल्या वेळेत विद्यार्थ्यांकडून अर्ज सादर न झाल्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.
विविध आरक्षणांअंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना आणि पडताळणीच्या वेळी जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रवेश अर्जासोबत सादर करणे अनिवार्य असते. परंतु, अशी कागदपत्र मिळवण्यासाठी विलंब होत आहे.
(वाचा : भारतातील पहिलं एआय विद्यापीठ सज्ज; मुंबईमध्ये तयार आहे देशातील पहिलीवहिली AI University)
शिवाय, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीही विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तंत्रशिक्षण संचालनालयाने अर्ज सादर आणि तपासणी करण्याच्या प्रक्रियेला जून महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच, ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती.
मात्र, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) कॉलेजांना मान्यता मिळण्यास विलंब होत आहे. शिवाय, विद्यार्थ्यांकडील कागदपत्रांअभावी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत विविध अडचणी येत असल्यामुळे, तंत्रशिक्षण विभागाने अर्ज करण्याच्या तारखेत पुन्हा एकदा मुदतवाढ केली आहे. त्यामुळे, तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या नवीन तारखेनुसार विद्यार्थ्यांना आता ७ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे.
थोडक्यात :
- इंजिनिअरिंग डिप्लोमा प्रवेशाची प्रक्रिया dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुरु असून आहे.
- प्रवेश प्रक्रियेसंबंधीत माहितीबरोबरच, अर्ज सादर करणे आणि पडताळणी ही याच वेबसाईटवर सुरु आहे.
- प्रवेश प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यात ३२८ सुविधा केंद्रांची सोय करण्यात आली आहे.
(वाचा : MU Idol Admission: आयडॉलच्या प्रवेशासाठी मुदतवाढ; ३० जूनऐवजी आता १५ जुलैपर्यंत भरता येणार प्रवेश अर्ज)
डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेच्या सुधारीत वेळापत्रकानुसार,
– विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरता आणि पडताळणी करू घेता येतील.
– तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने १० जुलैला प्रवेशासंदर्भात तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) प्रसिद्ध केली जाईल.
– ११ आणि १२ जुलैला अर्जामधील त्रुटी आणि सुधारणा नोंदवता येईल.
– १४ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) प्रसिद्ध केली जाईल.
डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेचा अर्ज dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरता येईल. या प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या होणार असून, तंत्रशिक्षण संचालनालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर या मुदतवाढी बाबत माहिती दिली आहे.
(वाचा : MahaTransco Recruitment 2023 : राज्याच्या वीज पारेषण विभागात नोकरीची संधी; ३१२९ पदांसाठी भरतीची घोषणा)