बारावीनंतर विद्यार्थ्यांना फार्मसी शाखेच्या दोन वर्षांच्या पदविका (डिप्लोमा) प्रवेश घेता येतो. हा अभयसक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणीकृत फार्मासिस्ट म्हणून काम करता येते.
(वाचा : Chandrakant Patil Announcement : उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन केल्या महत्त्वपूर्ण घोषणा)
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वीच २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात डी. फार्मची नवीन कॉलेज सुरु करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर तंत्र शिक्षण संचालनालयाने राज्य सरकारकडे या कॉलेजांच्या मान्यतेचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर राज्य सरकारने ही कॉलेज सुरु करण्यास मान्यता दिली आहे.
राज्य सरकारच्या मान्यतेनुसार नागपूर आणि अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येकी ३, बुलढाणा, जळगाव आणि नाशिकात प्रत्येकी २, तर कोल्हापूर, वर्धा, धुळे, सिंधदुर्ग, पालघर, चंद्रपूर, जालना, ठाणे, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक कॉलेज अशी राज्यभरात एकूण २२ कॉलेज सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
या प्रत्येक कॉलेजमध्ये डी.फार्मच्या अभ्यासक्रमासाठी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे. त्यामुळे राज्यात या अभ्यासक्रमासाठी एकूण १ हजार ३२० जागा उपलब्ध झाल्या आहेत.
(वाचा : भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज; मुंबईमध्ये तयार आहे देशातील पहिलीवहिली AI University)