वाय-फाय डायरेक्ट कसे काम करेल?
वाय-फाय डायरेक्ट फीचर दोन डिव्हाईसमध्ये सहज चॅट ट्रान्सफर करण्यास मदत करते. यासाठी दोन्ही डिव्हाईस वाय-फायशी जोडावे लागतील.
वाचा : फायद्याची बातमी! सरकारचा सामन्यांना दिलासा, मोबाईल-टीव्हीच्या किंमती झाल्या कमी
हा आहे मार्ग
- यासाठी दोन्ही उपकरणे एकमेकांच्या अगदी जवळ ठेवावी लागतात. मग ते वाय-फायशी कनेक्ट करावे लागेल. यासोबतच लोकेशनही चालू करावे लागेल.
- यानंतर, ज्या स्मार्टफोनमधून व्हॉट्सअॅप चॅट ट्रान्सफर करायचे आहे तो स्मार्टफोन चालू करा, त्यानंतर स्मार्टफोन सेटिंग्ज ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर चॅट ट्रान्सफर पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर QR कोड दिसेल. यानंतर नवीन फोनवरून चॅट हिस्ट्री स्कॅन करावी लागेल.
- पण त्याआधी नवीन फोनमध्ये व्हॉट्सअॅप डाउनलोड करावे लागेल. मग फोन नंबर नोंदणीकृत करावा लागेल.
- त्यानंतर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर दुसरा फोन वाय-फाय डायरेक्टशी कनेक्ट करावा लागेल.
- यानंतर, चॅट ट्रान्सफर करण्याची रिक्वेस्ट नवीन फोनमध्ये स्वीकारावी लागेल. ज्यानंतर चॅट नवीन फोनवर ट्रान्सफर होईल.
WhatsApp आणत आहे आणखी एक फीचर
WhatsApp कंपनी लवकरच एक आणखी फीचर लाँच करणार आहे. ज्याच्या मदतीने उच्च दर्जाचे व्हिडिओ पाठवण्यास मदत होईल. व्हॉट्सअॅपने यापूर्वी एचडी फोटो पाठवण्याचे फिचर आणले होते. त्यानंतर आता, एचडी व्हिडिओ पाठवण्यासाठी एक खास फीचर कंपनी आणत आहे. यामुळे युजर्सना एक भारी मल्टीमीडिया अनुभव मिळणार आहे. हे फीचर सध्या बीटा आवृत्तीमध्ये उपलब्ध आहे.
वाचा : भारतात फक्त Jio आणि Airtel हे दोनंच नेटवर्क टिकणार? पाहा TRAI चा जून महिन्याचा रिपोर्ट