देशभरातील टॉप १० विद्यार्थ्यांची यंदाही आयआयटी-मुंबईला पसंती; कम्युटर सायन्स इंजिनिअरिंगला विद्यार्थ्यांची पसंती

JEE Advance च्या निकालानंतर देशभरातील सर्वोत्तम १० (Top 10) विद्यार्थ्यांनी पवई येथील आयआयटी मुंबईला आपली पसंती दर्शवत, इथे आपला प्रवेश निश्चित केला आहे. तर, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या फेरीच्या अखेरीस देशभरातून सर्वोत्तम ५० ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३७ जणांनी या इतर कॉलेजांपेक्षा आयआयटी मुंबईला प्राधान्य आणि पसंती दिली.

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत सर्वोत्तम १०० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८९ विद्यार्थ्यांनी IIT-Mumbai ला त्यांची पसंती म्हणून निवडले होते. या संस्थेमधील कम्प्युटर सायन्स अभियांत्रिकी (Computer Science Engineering) अभ्यासक्रमासाठी आपली पसंती दर्शवली होती. परंतु, यातील ६७ विद्यार्थ्यांची इथे निवड करण्यात आली. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना इतर पर्यायांचा विचार करावा लागला.

(वाचा : भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज; मुंबईमध्ये तयार आहे देशातील पहिलीवहिली AI University)

प्रवेशाच्या या स्पर्धेतील टॉप १०० विद्यार्थ्यांपैकी २३ विद्यार्थ्यांनी आयआयटी-दिल्लीची, ९ विद्यार्थ्यांनी आयआयटी-मद्रासची निवड केली. तर, एक विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडला.

मागील दोन वर्षांपासून आयआयटी-मुंबई हे सर्वात जास्त मागणी असलेले टेक कॉलेज म्हणून चर्चेत आले आहे. या पाठोपाठ आयआयटी-दिल्ली आणि मद्रासचा या यादीत अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. शिकवण्याची पद्धत, प्रगत आणि सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि नोकरीच्या उत्तम संधी अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांचा आयआयटीकडे ओढा पाहायला मिळतो.

प्रवेश प्रक्रियेच्या या गर्दीत टॉप १०० पैकी १ तर, टॉप ५०० पैकी ३ विद्यार्थ्यांनी प्रक्रियेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

(वाचा : राज्यात २२ नव्या डी-फार्म कॉलेजांच्या सुरुवातीची घोषणा; कायम विनाअनुदानित तत्त्वावर ही कॉलेज सुरु करण्यास मान्यता)

यावर्षी एकूण २.२ लाख जॉइंट सीट अलोकेशन अथॉरिटी (JoSAA) द्वारे जागा वाटप प्रक्रियेसाठी नोंदणी केली होती. त्यांपैकी १.९ लाख उमेदवारांनी कॉलेज आणि स्ट्रीमची निवड केली आहे. १.६ लाख पुरुष, ५२ हजार १७० महिला आणि इतर तीन उमेदवारांनी जागा निवडीसाठी अर्ज भरला होता.

यंदा देशभरातील IIT, NIT, IIIT आणि इतर सरकारी अनुदानित तांत्रिक संस्थांसह ११९ संस्थांमध्ये ५७ हजार १५२ जागा उपलब्ध आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आयआयटी मुंबईचे उप. संचालक एस. सुदर्शन यांनी TOI ला दिलेल्या प्रतिक्रीयेत सांगतात, “विद्यार्थी त्यांच्या पदवीपूर्व शिक्षणासाठी IIT-B ला त्यांच्या पसंतीची संस्था म्हणून निवडतात याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही आमच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रक्रियेत आहोत. येत्या दोन वर्षांत आम्ही ३,३०० खोल्या असलेली तीन नवीन वसतिगृहे विद्यार्थ्यांसाठी तयार करत आहोत. याव्यतिरिक्त, आम्ही आमच्या अभ्यासक्रमात सतत नवनवीन बदल आणि सुधारणा करत असतो. IIT-B मधील विविध विभाग जगातील अव्वल क्रमांकावर आहेत. येथील त्यांच्या शैक्षणिक जीवनाव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना अनेक अभ्यासाव्यतिरिक्त सर्वांगीण विकास होण्यासही फायदेशीर असतात.”

(वाचा : मुंबई विद्यापीठाच्या १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा)

Source link

computer science engineeringengineeringiiitsIITiit bombayiit mumbaiindian institute of technologyJEE Advancednitstop 10 students
Comments (0)
Add Comment