अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर का हजर होत नाहीत?; वकिलांनी दिलं उत्तर

हायलाइट्स:

  • अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स
  • अनिल देशमुख पुन्हा चौकशीसाठी गैरहजर
  • देशमुखांच्या वकिलांनी दिलं उत्तर

मुंबईः माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पाचवा समन्स बजावला. आज ईडी कार्यालयात अनिल देशमुख यांची चौकशी होणार होती. मात्र, आजही देशमुख चौकशीसाठी हजर न राहिल्यानं अनेक तर्क-वितर्कांना उधाण येत आहे. अनिल देशमुख चौकशीसाठी हजर का राहिले नाहीत याबाबत त्यांचे वकिल इंडरपाल सिंग यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

अनिल देशमुखांना ईडीसमोर हजर राहता येणार नसल्याचा अर्ज दाखल करण्यासाठी ईडी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. ईडीला काही काळ वाट पाहण्यास आम्ही सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आम्ही याचिका दाखल केली आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल तोपर्यंत थांबाव, असं पत्र आम्ही ईडीला दिलं आहे, असं अनिल देशमुखांचे वकिल इंदरपाल सिंह यांनी म्हटलं आहे.

‘महाविकास आघाडीचे विकास काम कळवा आणि १५ हजारांचे बक्षीस जिंका’

तसंच, ईडीच्या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आम्ही चौकशीसाठी हजर राहू, असं देशमुखांच्या वकिलांनी सांगितलं आहे.

वाचाः पुण्यात खळबळ; तरुणाचा स्वतःला पेटवून घेत पोलीस आयुक्तालयात प्रवेशाचा प्रयत्न

दरम्यान, गृहमंत्री या नात्याने देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या आरोपानुसार ‘ईडी’ने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यामध्ये देशमुख यांचे स्वीय सचिव व स्वीय सहाय्यक, यांना अटक करण्यात आली आहे. तसेच देशमुख व त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची सुमारे साडे चार कोटी रुपयांची मालमत्तादेखील जप्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘ईडी’ने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी चार वेळा समन्स बजावला होता.

Source link

anil deshmukhAnil Deshmukh ed caseanil deshmukh latest newsअनिल देशमुखअनिल देशमुख ईडी प्रकरण
Comments (0)
Add Comment