कमाल झाली! पूजा साहित्य विक्रीच्या नावाखाली सुरू होता ‘हा’ उद्योग; पोलिसांच्या हाती आले घबाड

हायलाइट्स:

  • नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठी उघडकीस आला धक्कादायक प्रकार
  • पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे
  • पोलिसांच्या हाती आलं वेगळंच काही

नाशिक: गोदावरी नदीच्या काठावर पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दोन दुकानांत नाशिक पूर्व वन विभागाच्या पथकांनी धडक कारवाई केली. यामध्ये ४९० नग ‘ब्लॅक कोरल्स आणि सी फॅन्स’ म्हणजे, इंद्रजाल ताब्यात घेण्यात आले आहेत. ब्लॅक कोरल्स आणि सी फॅन्स हे सागरी जीव असून, ‘गूडलक चार्म’ या नावाने अंधश्रद्धेसाठी त्यांची बाजारात विक्री होत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली.

वाचा:पूरग्रस्त भागांतील दुकानदारांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा

घोरपडीच्या अवयवांपासून तयार केलेल्या हातजोडी-पायजोडी, इंद्रजाल, शिंपले, कवड्या, देवदार वृक्षाची बी, हळदीची बी आणि समुद्री नारळाचा वापर करून तयार केलेल्या २३ ट्रॉफी देखील हस्तगत केल्या आहेत. प्रत्येकी एक ट्रॉफीची किंमत ३ हजारांपासून पुढे आहे. तसेच मोठ्या प्रमाणात मोरपिसांचा साठा जप्त करण्यात आला आहे. नाशिकमध्ये पहिल्यांदा वन्यजीवांच्या अवयवांच्या विक्रीबाबत मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

वाचा: हा उद्धव ठाकरेंचा नवा महाराष्ट्र आहे; आमदाराची जहरी टीका

मंगळवारी सायंकाळी येवला-मनमाड रोडवर सापळा रचून योगेश रमेश दाभाडे (रा. येवला) याला इंद्रजालासह हातजोडी-पायजोडीच्या मुद्देमालासह वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीमध्ये नाशिकच्या गोदाकाठी दुकानांमध्ये मोठा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आज, बुधवारी कारवाई करण्यात आली. हे साहित्य गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याहून नाशिकमध्ये दाखल होत असल्याचा वन खात्याचा अंदाज आहे. त्यानुसार पुढील तपासासाठी पथके रवाना झाली असून, ज्या घरांमध्ये इंद्रजाल अथवा हातजोडीचे साहित्य असेल, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा वन खात्याने दिला आहे.

वाचा: रेल्वे प्रवासाबाबत सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे महत्त्वाची मागणी

Source link

Black Corals Sell in Nashiknashiknashik crime newsnashik latest newsगूडलक चार्मनाशिक
Comments (0)
Add Comment