मुंबई विद्यापीठाच्या बीएफएम आणि लॉ अभ्यासक्रमाचा निकाल जाहिर; BFM चा ७३.७१ टक्के तर, लॉ परीक्षेचा फक्त ५८.४१ टक्के निकाल

मुंबई विद्यापीठाच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात संपन्न झालेल्या उन्हाळी सत्राच्या वाणिज्य विद्याशाखेच्या (Commerce Faculty) तृतीय वर्ष बीकॉम बीएफएमचा (फायनांशिअल मार्केटस) च्या सत्र ६ तर, ५ वर्षीय विधी शाखेच्या (Law Department) १० व्या सत्राचा निकाल जाहिर करण्यात आला आहे.

बीएफएम सत्र ६ च्या परीक्षेमध्ये एकूण ६५६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. यंदा या परीक्षेसाठी १ हजार ३१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी, १ हजार ३०० एवढे विद्यार्थी परीक्षेस बसले होते.तर, १६ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले. या परीक्षेत २३४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, बीएफएम सत्र ६ चा निकाल ७३.७१ एवढा टक्के लागला आहे.

(वाचा : ही आहेत महाराष्ट्रातील बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस; आयआयटी-मुंबईसह मुंबईच्या या कॉलेजांचाही समावेश)

पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या सत्र १० च्या परीक्षेमध्ये एकूण ८०६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. १ हजार ५६९ नोंदणी केल्या विद्यार्थ्यांपैकी १४ विद्यार्थी मूळ परीक्षेस अनुपस्थित राहिले. तर, ५७४ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांची अनुपस्थिती आणि अनुतीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यांमुळे विधी विभागाचा निकाल ५८.४१ टक्के लागला आहे.

विधी शाखेच्या (३ वर्षीय ) सत्र ६ चे मूल्यांकन पूर्ण झाले असून हाही निकाल जाहीर करणार असल्याची घोषण मुंबई विद्यापीठाने केली.

विद्यापीठाने आजपर्यंत २०२३ च्या उन्हाळी सत्राचे विविध विभाग आणि शाखांचे तब्बल ८३ निकाल जाहीर केले आहेत. हे परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

(वाचा : मुंबई मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध; २२ जागांवर नोकरीची संधी, १ ऑगस्ट पर्यंत भरता येणार अर्ज)

Source link

bcombfmconvocationexaminationslawMU Resultsmumbai universityresultstoppersuniversity of mumbai
Comments (0)
Add Comment