भारतीय रेल्वेत पुन्हा एकदा मोठ्या भरतीची संधी; तब्बल एक हजाराहून अधिक जागा उपलब्ध

भारतीय रेल्वेच्या उत्तर-पूर्व भागात एकूण १ हजार १०४ जागांच्या पदभरतीची जाहिरात भारतीय रेल्वेकडून नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. ३ जुलैला या जागांसाठीच्या ऑनलाइन अर्जांना सुरुवात झाली असून, इच्छुक आणि पत्र उमेदवारांना २ ऑगस्ट २०२३ ला सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

सदर जागा अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी असून, उमेदवारांचे प्रशिक्षण आणि नोकरीसाठीचे ठिकाण भारतातील विविध भागांमध्ये असण्याची शक्यता आहे. या जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दलची सर्व माहिती उपलब्ध आहे.

(वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये १००० रिक्त पदांसाठी भरतीला सुरुवात; थेट मॅनेजर पदावर काम करण्याची संधी)

प्रशिक्षणार्थीच्या या जागांसाठी आहे भरती :

एकूण जागा : ११०४
१. यांत्रिक कारखाना/ गोरखपूर : ४११ जागा
२. सिग्नल कारखाना/ गोरखपूर छावणी : ६३ जागा
३. पूल कारखाना/ गोरखपूर छावणी : ३५ जागा
४. यांत्रिक कारखाना/ इज्जतनगर : १५१ जागा
५. डिजल शेड/ इज्जतनगर : ६० जागा
६. केरीज आणि वैगन/ इज्जतनगर : ६४ जागा
७. केरीज आणि वैगन/ लखनऊ जंक्शन : १५५ जागा
८. डिजल शेड/गोंडा : ९० जागा
९. केरीज आणि वैगन/ वाराणसी : ७५ जागा

(वाचा : मुंबई मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध; २२ जागांवर नोकरीची संधी, १ ऑगस्ट पर्यंत भरता येणार अर्ज)

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त संस्थेतून ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण
  • मान्यताप्राप्त संस्थेतून ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण
  • आयटीआय (फिटर, वेल्डर, कार्पेंटर, पेंटर, टर्नर, इलेक्ट्रिशिअन, मॅकेनिक)

महत्त्वाचे :

० उमेदवाराने अज्रामध्ये दिलेली माहिती चुकीची अथवा खोटी आढळल्यास उमेदवाराचा अर्ज भरती प्रक्रियेच्या कोणत्यही टप्प्यावर रद्द केला जाईल.
० अर्ज भरताना उमेदवाराने सध्या चालू असणारा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देणे अत्यंत आवश्यक आहे.
० ही भरती प्रक्रिया ऑनलाइन होणारं असल्याने इतर कोणत्यही मार्गांनी (पोस्ट अथवा कुरिअर) आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
० दिलेय तारखेनंतर आलेल्या अर्जांचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही.
० या पदभरती मधील तारखांमधील बदल आणि पुढील कार्यवाहीची माहिती वेळोवेळी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.

(वाचा : Maharashtra Talathi Bharti 2023: महसूल व वन विभाग तलाठी पदभरती; ४३४४ पदांसाठी महाभरती)

Source link

government jobshsc passoutsindian railway jobsindian railway recruitmentitinorth eastern railwayrailway jobrailway jobssarkari naukarissc passouts
Comments (0)
Add Comment