सीए इंटरमिडिएट आणि सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहिर; अहमदाबादचा अक्षय जैन देशातून पहिला

इन्स्टिट्यूट ऑफ चार्चर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या सीए परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. सीए इंटरमिडिएट आणि सीए फायनलच्या परीक्षा या वर्षी मे महिन्यात झाल्या होत्या.

यावर्षी सीए इंटरमीडिएट परीक्षा ३ मे २०२३ ते १८ मे २०२३ या दरम्यान घेण्यात आली. CA ची अंतिम परीक्षा २ मे २०२३ ते १७ मे २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. आज त्याचा निकाल घोषित करण्यात आलेला आहे.

(वाचा : JEE Advanced च्या मार्कांविना IIT मध्ये प्रवेश मिळवण्याची संधी; कशी.. जाणून घ्या)

यंदा अहमदाबादचा अक्षय रमेश जैन ८०० पैकी ६१६ गुण म्हणजेच ७७ टक्के मिळून देशात पहिला ला आहे. चेन्नईचा कल्पेश जैन ७५.३८ टक्के मिळवून देशात दुसरा तर, नवी दिल्ली येथील प्रखर वार्ष्णेय ७१.७५ टक्के मिळवून देशात तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.

मोलाचा क्षण…

आजचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. मला आज मिळालेल्या या यशात माझ्या इतका माझ्या पालकांचाही मोलाचा वाट आहे. हे यश आणि त्यामागची माझी आणि माझ्या पालकांची मेहनत ही शब्दांमध्ये मांडण अशक्य आहे. हे यश पाहण्यासाठी मी आणि माझ्यासाठी अनेकांनी केलेल्या मेहनतीची मला जाणीव आहे आणि मी त्या सगळ्यांचा कायम ऋणी राहीन.
-अक्षय रमेश जैन (All India Topper First Ranker)

(वाचा : भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज; मुंबईमध्ये तयार आहे देशातील पहिलीवहिली AI University)

अक्षय कडून स्मार्ट टिप्स :

० ही परीक्षा देताना तुमचा स्वतःवर आत्मविश्वास असणे गरजेचे आहे.
० तुमची मेहनत करण्याची तयारी असणे खूप गरजेचे आहे.
० सातत्य ही परीक्षेची गुरुकिल्ली आहे.
० फक्त एक महिन्याच्या अभ्यासाने पास यश मिळवण्याची ही परीक्षा नाही.
० अनेकदा अपयश आले तरी, त्यावर मात करून जोमाने तयारीला लागणे महत्त्वाचे असते.
० सततचा सराव आणि मॉक टेस्टच्या माध्यमातून स्वतःला आणि स्वतःच्या गुणवत्तेला तपासून त्यानुसार अभ्यास करा.

उमेदवारांना icai.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल बघता येणार आहे.

असा बघा निकाल

1. अधिकृत वेबसाइट icai.nic.in वर जा.
3. ICAI CA इंटर रिझल्ट २०२३ वर क्लिक करा.
4. ICAI CA अंतिम निकाल २०२३ चा निकाल पाहण्यासाठी, त्याच्या लिंकवर क्लिक करा.
4. आवश्यक ती माहिती भरा
5. निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
6. PDF मध्ये सेव्ह करून निकालाची प्रिंट आउट घ्या.

(वाचा : ही आहेत महाराष्ट्रातील बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस; आयआयटी-मुंबईसह मुंबईच्या या कॉलेजांचाही समावेश)

Source link

ahmedabadakshay jaincaca resultca result 2023charter accountanteconomyicai ca final result 2023resultsresults today
Comments (0)
Add Comment