NLC India Limited ने जाहीर केली महाभरती; इंजिनिअर, मॅनेजर पदांसह अनेक जागांसाठी भरती

NLC Recruitment 2023: एनएलसी इंडिया लिमिटेडने रिक्त जागांच्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे. NLC च्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दलची माहिती जाहीर करण्यात आली आहे.

एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, मॅनेजरसह, जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर या आणि अशा तब्बल २९४ जागांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. भरतीसाठी अर्ज जमा करण्याच्या प्रक्रियेला ५ जुलैपासून २०२३ पासून सुरुवात झाली असून, इच्छुक उमेदवारांना ३ ऑगस्ट २०२३ पर्यत अर्जाची पूर्तता करता येणार आहे.

NLC च्या या भरती अंतर्गत विविध पदांची भरती होणार आहे. भरतीसंबधित पात्रता, निवड प्रक्रियेसह एनएलसी इंडिया लिमिटेड भरती २०२३ शी संबंधित सविस्तर माहिती तुम्हाला या लेखात मिळणार आहे.

(वाचा : सीए इंटरमिडिएट आणि सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर; अहमदाबादचा अक्षय जैन देशातून पहिला)

महत्त्वाच्या तारखा :

० NLC भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी : ५ जुलै २०२३ पासून सकाळी १० वाजल्यापासून
० या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख : ३ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यंत.
० अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०२३ (रात्री ११.४५) आहे.
ज्या उमेदवारांनी नोंदणी आणि शुल्क आधीच भरले आहे ते ४ ऑगस्ट २०२३, सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.

उमेदवारांची वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता :

  • NLC साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ३० ते ५४ वर्षे दरम्यान असावी.
  • NLC पदभरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार बीटेक, बीई, एमएससी, एमटेक, सीए, पीजी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
  • शिवाय, एमबीएसह इतर काही शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवारही या पदांसाठी अर्ज करू शकतात.

(वाचा : Central Bank of India Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये १००० रिक्त पदं; थेट मॅनेजर पदावर काम करण्याची संधी)

असा भरा अर्ज :

  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्यासाठी NLC India Limited च्या www.nlcindia.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी आणि अर्ज भरायला सुरुवात करण्यापूर्वी उमेदवाराने आपला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी सुरु असल्याची खात्री करून घ्यावी आणि अर्ज करताना त्याचं मोबाईल क्रमांकाचा वापर करावा .
  • अर्ज करताना उमेदवाराला शैक्षणिक कागदपत्रे, आरक्षणाचे दाखले व इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.
  • एकाच उमेदवाराला एकाहून अधिक पदांसाठी (वेगवेगळ्या) जागांसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. मात्र, उमेदवाराने प्रत्येक जागेसाठी वेगळा अर्ज सादर करणे आणि वेगळी अर्जाची फी भरणे अत्यावश्यक आहे.
  • एकाच पोस्टसाठी एकाहून अधिक अर्ज केल्यास सदर पोस्टसाठी सादर केलेला कोणताही अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी NLC India Limited जाहीर केलेली नियमावली वाचा.

अर्ज शुल्क

सामान्य, एडब्ल्यूएस, ओबीसी (एनसीएल) वर्गातील उमेदवार : ८५४ रुपये
एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी श्रेणी आणि माजी सैनिक – ३५४ रुपये

(वाचा : Indian Railway Recruitment 2023: भारतीय रेल्वेत पुन्हा एकदा मोठ्या भरतीची संधी; तब्बल एक हजाराहून अधिक जागा उपलब्ध)

Source link

Government jobgovernment job openingsJob Opening at NLCjob openings 2023new job openingsnlcnlc india limitednlc recruitmentRecruitment 2023sarkari naukari
Comments (0)
Add Comment