भारतीय सांख्यिकी संस्था (ISI)
वेबसाइट : https://www.isical.ac.in/
भारतीय सांख्यिकी संस्थेची (ISI) ची स्थापना १७ डिसेंबर १९३१ रोजी झाली.ही संस्था सांख्यिकी आणि संबंधित विज्ञानांमध्ये प्रशिक्षण आणि संशोधनाचे काम करते. भारतीय सांख्यिकी संस्थेचे मुख्यालय बारानगर, कोलकाता येथे आहे. त्याची दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आणि तेजपूर येथे चार केंद्रे आणि गिरिडीह येथे शाखा आहेत. (फोटो सौजन्य : https://www.isical.ac.in/ )
बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स (BITS-Pilanil)
वेबसाइट : https://www.bits-pilani.ac.in/
भारतातील सर्वात जुने आणि बहुचर्चित संस्थांच्या यादीत Birla Institute of Technology & Science चे नाव घेतले जाते. भारताच्या राजस्थान राज्यात या संस्थेचे मुख्यालय असून, याव्यतिरिक्त गोवा, हैद्राबाद आणि दुबईमध्येही पिलानीच्या शाखा उपलब्ध आहेत. (फोटो सौजन्य : https://www.bits-pilani.ac.in/ )
1200 X 900 px (22)
वेबसाइट : https://manipal.edu/mit.html
मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था मणिपाल विश्वविद्यालयाचा भाग आहे. इंजिनिअरिंग आणि टेक्निकल अभ्यासक्रम शिकवणारे एक उत्तम कॉलेज आहे. मलेशिया, दुबई, जयपूर याठिकाणीही विविध अभ्यासक्रम पुरवणाऱ्या त्यांच्या शाखा उपलब्ध आहेत.
(फोटो सौजन्य : https://manipal.edu/mit.html )
1200 X 900 px (23)
वेबसाइट : https://vit.ac.in/
वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भारताच्या वेल्लोरमधील काटपाडीमध्ये वसलेले आहे.ही एक खाजगी संस्था आई. ६६ पदवीपूर्व, ५८ पदव्युत्तर आणि अनेक अभ्यासक्रमांविषयी सर्वत्र चर्चा आहे. या संस्थेच्या शाखा चेन्नई,अमरावती आणि भोपाळ येथे आहेत. भारत सरकारने व्हिआयटीला प्रतिष्ठित संस्था (IoE) पैकी एक म्हणून मान्यता दिली आहे. ( फोटो सौजन्य : https://vit.ac.in/ )
सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT)
वेबसाइट : https://www.sitpune.edu.in/
सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी), हे भारतातील पुणे शहरात स्थित एक बहु-कॅम्पस खाजगी डीम्ड विद्यापीठ आहे. विद्यापीठात पुणे, बंगलोर, हैदराबाद, नागपूर, नाशिक, नोएडा येथील विविध कॅम्पसमध्ये पसरलेल्या ४१ हून अधिक शैक्षणिक संस्था आहेत. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी २०२० मध्ये इंडियाच्या यादीनुसार इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये ४८ व्य क्रमांकावर होते. तर, आउटलुक इंडियाद्वारे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात हे भारतातील खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये १३व्या क्रमांकावर होते.
( फोटो सौजन्य : https://www.sitpune.edu.in/ )
थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (TIET)
वेबसाइट : https://www.thapar.edu/
थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, भारतातील पंजाब राज्यात स्थित आहे. देशातील सर्वाधिक जुन्या संस्थांपैकी ही एक संस्था असून, NAAC कडून A+ ग्रेडही मिळाला आहे. ( फोटो सौजन्य : https://www.thapar.edu/ )
एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (SRM)
वेबसाइट : https://www.srmist.edu.in/
एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेला आधी एसआरएम विद्यापीठ यानावाने ओळखले जात होते. हे एक खाजगी डीम्ड विद्यापीठ आहे, जे चेन्नईमध्ये स्थित आहे. एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे सहा कॅम्पस असून, तमिळनाडूमधील कट्टनकुलथूर, रामापुरम, वडापलानी आणि तिरुचिरापल्ली महाराष्ट्रात अमरावती आणि दिल्लीत आहे. (फोटो सौजन्य : https://www.srmist.edu.in/ )