डिस्काउंट ऑफर्ससह खास बँक ऑफर्सही
Amazon च्या या सेलमध्ये ICICI आणि SBI कार्डवर थेट १० टक्के सूट दिली जाईल. यासोबतच एक्सचेंज ऑफरसह इतर अनेक डिस्काउंट ऑफर देण्यात येणार आहेत. या सेलसाठी कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करू शकतात.
वाचा : स्मार्टफोनमधील RAM मुळे खरचं फोन फास्ट होतो का? किती जीबी रॅम आहे बेस्ट? पाहा तज्ज्ञांचा सल्ला
लेटेस्ट फ्लिप फोन स्वस्तात मिळवण्याची संधी
या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर एकापेक्षा एक ऑफर्स आहेत. यातच नवीन लाँच झालेले मोटोरोलाचे फ्लिप फोन स्वस्तात घेता येणार आहेत. Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra Amazon प्राइम डे सेलमध्ये स्वस्तात ऑफर केले जाऊ शकतात. या दोन्ही स्मार्टफोनच्या खरेदीवर कंपनी जवळफास ७००० रुपयांची सवलत दिली जात आहे.
मिड बजेट फोनवरही ऑफर्स
या सेलमध्ये विविध कंपनीच्या आणि विविध बजेटमधील स्मार्टफोन्सवर ऑफर दिली गेली आहे. यात Redmi च्या 50i स्मार्टफोनच्या खरेदीवर भरघोस डिस्काउंट ऑफर दिली जाऊ शकते. हा स्मार्टफोन २३,९९९ रुपयांमध्ये असून सेलमध्ये डिस्काउंटनंतर हा फोन २०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. तुम्ही यासोबतच iQOO 11 स्मार्टफोन ५४,९९९ रुपयांऐवजी ४९,००० रुपयांना खरेदी करू शकाल.
स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची संधी
या सेलमध्ये iPhone 14 ची सर्वाधिक मागणी असणार. कारण नवीन आयफोन लाँच होणार असल्याने हा आयफोन १४ एकदम स्वस्तात मिळू शकतो. हा सर्वात जास्त मागणी असलेला स्मार्टफोन आहे. हा फोन सेलमध्ये ५० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. याच्या बेस व्हेरिएंटची किंमत ६६,९९९ रुपये आहे. सेलमध्ये फायर टीव्ही स्टिक, इयरफोन आणि हेडफोन स्वस्तात खरेदी करू शकतील.
आणखी स्मार्टफोन्सवरही ऑफर्स
वर सांगितल्याप्रमाणे मोटोरोलाच्या फ्लिप फोन्सवर ऑफर असून iQOO Neo 7 Pro वरही ऑफर आहे. सेलच्या आधीच हा फोन प्राइम डे सेल पेजवर ३३,९९९ रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध केला आहे. तसंच Realme च्या लोकप्रिय Narzo सीरीजच्या आगामी Realme Narzo 60 स्मार्टफोनच्या नवीन एडिशनची किंमत देखील समोर आली आहे. हा बजेट स्मार्टफोन १७,९९९ रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे.