Raksha Bandhan 2023 Date: रक्षाबंधन कधी आहे? अधिक मासामुळे लांबणीवर गेला सण
रक्षाबंधनावर भद्राची छाया
ज्योतिष शास्त्रानुसार यावेळी रक्षाबंधनावर भद्राची छाया पडत आहे. शास्त्रानुसार सूर्याची कन्या भद्रा हिला ज्योतिष शास्त्रात खूप अशुभ मानले जाते. तिन्ही लोकांमध्ये भद्राचा वास असतो असे म्हणतात. ती तिन्ही लोकांमध्ये सतत फिरत राहते. जिथे भद्रा असते तिथे शुभ कार्य होत नाही. याचे कारण म्हणजे भद्रा काळात केलेले कार्य शुभ फल देत नाही. रक्षाबंधनावर भद्राची छाया असल्याने बहिणी भद्रा काळात राखी बांधत नाहीत.
यामुळे भद्राकाळात राखी बांधत नाही
भद्रा काळात शूर्पणखाने तिचा भाऊ रावणाला राखी बांधली होती, असे पौराणिक मान्यतेमध्ये सांगितले जाते. याचा परिणाम असा झाला की रावणाच्या संपूर्ण वंशाचा नायनाट झाला. रावणाचा अंत झाला होता, त्यामुळे भद्राकाळात राखी बांधू नये असे मानले जाते. भद्रामध्ये राखी बांधल्याने भावाचे आयुष्य कमी होते, असेही मानले जाते.
Shani Mangal Samsaptak Yog: शनि मंगळ समसप्तक योग, येत्या ४८ दिवसांत देशात आणि जगात घडू शकतात ‘या’ मोठ्या घटना
राखी बांधण्याचा मुहूर्त
हिंदू पंचांगाच्या गणनेनुसार, या वर्षी श्रावण महिन्याची पौर्णिमा ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०.५८ ते ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७.५८ पर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे. रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०.५८ ते ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७.५८ पर्यंत असेल. पण ३० ऑगस्टला सकाळी १०.५८ वाजता भद्राकाळ सुरू होईल आणि त्याच दिवशी रात्री ९.१५ वाजता संपेल. त्यामुळे रक्षाबंधन रात्री ९.३० ते सकाळी ७.३० पर्यंत साजरे करू शकतात.
यंदा ८ श्रावण सोमवार; ‘या’ शुभ योगात पहिला श्रावण सोमवार, जाणून घ्या तिथी आणि पूजाविधी