त्यात, अहमदाबादचा अक्षय रमेश जैन ७७ टक्के मिळून देशात पहिला आला आहे. चेन्नईचा कल्पेश जैन ७५.३८ टक्के मिळवून देशात दुसरा तर, नवी दिल्ली येथील प्रखर वार्ष्णेय ७१.७५ टक्के मिळवून देशात तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.
आता, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) तर्फे सीए इंटरमिडिएट आणि सीए फायनलच्या CA November सेशनच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तसेच पुढील सेशनच्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. या परीक्षेची नोंदणी प्रक्रिया (Registration Process) ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे.
सीए फाऊंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनल नोव्हेंबर महिन्यातील परीक्षेसाठी विद्यार्थी आणि उमेदवारांना २ ऑगस्ट २०२३ पासून अर्ज करता येणार आहे. तर, २३ ऑगस्ट २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
पात्र उमेदवारांना ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत लेट फी (late fees) भरून अर्ज करता येणार आहे. शिवाय, अर्जातिल त्रुटी सुधारण्यासाठी आणि बदलासाठी १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२३ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
(वाचा : भारतातील वकिलांसाठी हे आहे सर्वोत्तम करिअरचे पर्याय…)
असा करा अर्ज..?
० ICAI तर्फे जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, CA फाऊंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनल परीक्षेसाठी अर्जाची प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन घेतली जाणार आहे.
० त्यासाठी, ICAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करता येईल.
० ही रजिस्ट्रेशन लिंक २ ऑगस्ट २०२३ पासून ICAI च्या ऑफशिअल वेबसाईटवर सुरु होईल.
० इच्छुक विद्यार्थी आणि उमेदवारांनी रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख येणयापूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.
उत्तर देण्यासाठी भाषा निवडीचा पर्याय :
- फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना उत्तरपत्रिकांसाठी इंग्रजी किंवा हिंदी माध्यम निवडण्याची परवानगी असेल. यासंदर्भातील, तपशीलवार माहिती https://eservices.icai.org वर उपलब्ध आहे.
- शिवाय, Post Qualification कोर्स संदर्भात परीक्षेचे माध्यम फक्त इंग्रजी असेल. म्हणजेच, आंतरराष्ट्रीय कर-मूल्यांकन चाचणी (INTT AT) आणि विमा आणि जोखीम व्यवस्थापन (IRM) सारख्या परीक्षा इंग्रजी भाषेत देणे बंधनकारक असेल.
(वाचा : PGCIL Recruitment 2023: ‘पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’मध्ये तब्बल १०३५ जागांसाठी महाभरती; आत्ताच करा अर्ज)